27 July 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Zilla Parishad Election Results 2021 | नागपूर जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा | भाजपचा पराभव

Zilla Parishad Election Results 2021

नागपूर, ०६ ऑक्टोबर | राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं (Zilla Parishad Election Results 2021) लक्ष लागलं आहे.

Zilla Parishad Election Results 2021 Congress victory in Nagpur Zilla Parishad. According to the current results, Congress has won 9 out of 16 Zilla Parishad seats. Here, the BJP has won only 2 seats :

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झाले. याच निवडणुकीचा निकाल आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात येत आहे.

नागपूर जिल्हा परिषद:
सध्या हाती आलेल्या निकालानुसार 16 जिल्हा परिषद जागांपैकी 9 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत जिल्हा परिषद काबीज केली आहे. इथे भाजपला फक्त 2 जागी विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर विजय मिळाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Zilla Parishad Election Results 2021 Congress victory in Nagpur Zilla Parishad.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x