19 August 2022 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या
x

Investment Tips | बँके पेक्षा पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला अधिक परतावा मिळेल | गुंतवणुकीसाठी सुरक्षित

Investment Tips

Investment Tips | सामान्य गुंतवणूकदार हा नेहमीच सुरक्षित आणि अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा शोध घेत असतो. परंतु अनेकदा असं होतं की त्याला या योजनांची पूर्ण माहिती नसल्याने अनेकदा  गुंतवणुकीवर नुकसान  सहन करावे लागत.  त्यासाठीच आम्ही तुम्हाला अशा एका गुंतवणुक योजनेची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बँकेच्या तुलनेत अधिक परतावा मिळेल.

ही योजना आहे पोस्ट ऑफिस संबंधित :
पोस्ट ऑफिस मधील गुंतवणुक ही सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या योजनांना  आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्यावर थेट केंद्र सरकारची हमी असते. त्यामुळे आज आपण अशाच एका उत्तम योजने बद्दल बोलणार आहोत.  ही योजना आहे भारतीय किसान विकास पत्र.

किसान विकास पत्र आणि व्याजदर :
किसान विकास पत्र योजनेवर साध्या 6.9 टक्के इतकं व्याज दिलं जातं. व्याजाचा हा दर वार्षिक आधारावर गणला जातो.  हा व्याजदर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा नेहमीच अधिक आहे. विशेष म्हणजे या व्याजदरात भारत सरकारने मागील दोन वर्षात कोणतेही बदल केले नाहीत. या योजनेत तुम्ही तुमची एकूण गुंतवणूक दहा वर्षांमध्ये दुप्पट करू शकता.

कमीत-कमी गुंतवणुक :
किसान विकास पत्र योजनेत किमान गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवी तेवढी रक्कम या योजनेमध्ये गुंतवू शकता आणि त्यानंतर शंभरच्या पर्टीत ती रक्कम कितीही प्रमाणात वाढवू शकता. 

हे खाते कोणाला उघडता येते :
किसान विकास पत्र मध्ये भारताचा कोणताही प्रौढ नागरिक खाते उघडू शकतो. कुटुंबातील दोन किंवा अधिक व्यक्ती सुद्धा  जॉइंट खाते उघडू शकतात. कुटुंबातील मुलांचे वय दहा वर्षांपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या नावे हे खाते उघडता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Tips on post office scheme check details here 06 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x