6 May 2025 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची 'ही' योजना सर्वाधिक देईल, परतावा रक्कम देखील मोठी मिळेल

Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट ही पोस्ट ऑफिसद्वारे चालविली जाणारी मुदत ठेव योजना आहे. कमीत कमी 1000 रुपये आणि 100 रुपयांच्या मल्टीपल गुंतवणुकीसह खाते उघडता येते. सध्या या योजनेअंतर्गत 6.9 टक्के, 7.0 टक्के, 7.1 टक्के आणि 7.5 टक्के व्याज दर आहे. हा व्याजदर 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंटसाठी चार टर्म असतात जे तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांमधून निवडू शकता. या खात्यात किमान ठेवरक्कम एक हजार रुपये आहे. व्याजाची गणना तिमाही केली जाते परंतु वार्षिक आधारावर देय असते.

कोण उघडू शकतं खातं?
एकच प्रौढ व्यक्ती हे खाते उघडू शकते. संयुक्त खाती (3 प्रौढांपर्यंत) (जॉइंट ए किंवा जॉइंट बी) उघडता येतात. याशिवाय अल्पवयीन मुलाच्या वतीने पालकाला हे खाते उघडण्याचा अधिकार आहे. १० वर्षांवरील अल्पवयीन मुलाच्या नावे खाते उघडता येते.

टर्म – व्याजदर
* 1 वर्ष – 6.9%
* 2 वर्षे – 7.9%
* 3 वर्षे – 7.1%
* 5 वर्षे – 7.5%

डिपॉझिट
कमीत कमी १००० आणि १०० रुपयांच्या पटीत खाते उघडता येते. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. व्याज दरवर्षी देय असेल. अर्ज सादर करून खातेदाराच्या बचत खात्यात वार्षिक व्याज जमा करता येते. 5 वर्षांच्या मुदत ठेवीअंतर्गत गुंतवणूक आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 सी चा लाभ घेण्यास पात्र आहे.

मॅच्युरिटी टर्म
खाते उघडल्याच्या तारखेपासून १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे, ५ वर्षे संपल्यानंतर गुंतवणूकदाराला अनामत रक्कम दिली जाते.

प्री-मॅच्युअर खाते
ठेवीच्या तारखेपासून सहा महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी अनामत रक्कम काढता येणार नाही. जर मुदत ठेव खाते 6 महिन्यांनंतर परंतु 1 वर्षापूर्वी बंद केले तर पीओ बचत खात्यावरील व्याज दर लागू होईल. पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज सादर करून टीडी खाते मुदतपूर्व बंद करता येते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Interest Rate RD scheme check details 13 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या