 
						Post Office Scheme | गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणुकीचे बहुतांश पर्याय उपलब्ध झाले आहेत. नोकरी करणारा व्यक्ती आयुष्याची जमापुंजी जपून ठेवण्यासाठी चांगल्या परताव्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. SIP, म्युच्युअल फंड या योजनांमध्ये आतापर्यंत अनेकांनी पैसे गुंतवून लाखो करोडोंची कमाई केली आहे. याव्यतिरिक्त पोस्टाच्या योजनांबद्दल देखील आपण बऱ्याचदा ऐकतो.
पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असल्यामुळे अनेकांना पैसे गुंतवून सुरक्षिततेची गॅरंटी त्याचबरोबर परताव्याची हमी मिळते. यासाठी लोक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. पोस्टाची अशीच एक ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ आहे. जी गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देते. जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :
पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग योजना ही पोस्टाद्वारे राबविण्यात येणारी अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ व्यक्तींना गुंतवणुकीवर वेगवेगळे लाभ अनुभवता येतात. सध्याच्या घडीला या योजनेत 8.2% ने व्याजदर प्रदान केले जात आहे. दरम्यान या योजनेमध्ये तुम्हाला एकरक्कम पैसे गुंतवावे लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला व्याजदरावर फायदा मिळू लागतो.
योजनेच्या फायद्यांविषयी देखील जाणून घ्या 
1. रेग्युलर इन्कम : 
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्याचा एक उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतो. योजनेत गुंतवणूक करून तुम्ही रेगुलर इन्कम मिळवू शकता. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याचा बजेट निश्चित करण्यास कोणतीही अडचणी येणार नाही.
2. 30 लाखांची गुंतवणूक :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या योजनेमध्ये भारताचा कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 30 लाखांपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही भडगंज पैसे गुंतवून दुप्पटीने नफा कमवू शकता.
3. टॅक्स बचत :
योजनेची एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला कर सवलतीचा फायदा मिळतो. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळते.
खातं उघडण्यासाठी काय करावे :
पोस्टाचं सीनियर सिटीजन सेविंग स्कीम योजनेचं खातं उघडण्यासाठी तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वतःच्या नावावर खातं उघडून घेऊ शकता. त्याचबरोबर अकाउंट खोलण्यासाठी व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील लागेल. योजनेत तुम्ही कमीत कमी हजार रुपये गुंतवून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 30 लाख रुपये दिले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		