
Post Office Scheme | पैशांच्या गुंतवणुकीसाठी भारतातील बहुतांश लोक पोस्टाच्या योजनांवर अधिक विश्वास ठेवतात. कारण की पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असतात. सरकारी योजना असल्यामुळे तुम्हाला परतव्याची 100% हमी मिळते.
आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. योजनेचे नाव (पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट) म्हणजेच पोस्ट ऑफिस RD योजनेबद्दल आम्ही सांगत आहोत. ही योजना खास करून निवृत्तीनंतर चांगलं आयुष्य घालवणाऱ्यांसाठी, त्याचबरोबर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटसारख्या इन्व्हेस्टमेंट टूलमध्ये पैसे गुंतवण्यास रिस्क नको असणाऱ्यांसाठी फायद्याची आहे. कारण की या योजनेमध्ये केवळ तुम्ही गुंतवलेल्या पैशांप्रमाणेच तुम्हाला रिटर्न मिळणार. ही मार्केट बेस्ड योजना अजिबात नाहीये. त्याचबरोबर तुम्ही या योजनेत केवळ 100 रुपयांची आरडी करून गुंतवणूक सुरू करू शकता.
सोप्या कॅल्क्युलेशनमधून गुंतवणुकीचा मार्ग समजून घ्या :
समजा तुम्ही प्रत्येक दिवसाला 100 रुपयांची बचत करत असाल तर, महिन्याच्या हिशोबानुसार तुमच्याजवळ एकूण 3000 रुपये जमा होतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला केवळ मात्र 3000 रुपये आरडी योजनेत गुंतवणे सुरू केले तर, एका वर्षामध्ये ही रक्कम 36000 रुपये एवढी होईल. योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असल्यामुळे. तुम्ही एकूण 5 वर्षांमध्ये 1,80,000 रक्कम गुंतवाल.
सध्याच्या घडीला या योजनेवर 6.7% दराने व्याजदर प्रदान केले जात आहे. हे व्याजदर तुम्हाला वार्षिक आधारावर मिळणार. म्हणजेच 5 वर्षांत तुम्ही केवळ व्याजाने 34,000 रुपये कमवाल आणि मॅच्युरिटीपर्यंत तुमच्या खात्यात गुंतवणूक आणि व्याजाची रक्कम मिळून 2,14,097 लाख रुपयांचा फंड तयार होईल.
मॅच्युरिटीआधी योजना बंद केल्याने कोणते नुकसान सहन करावे लागेल :
समजा तुम्ही पोस्टाच्या RD योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि अचानक तुमचा निर्णय बदलल्यामुळे आरडी योजना बंद केली तर, तुम्हाला जमा रक्कमेवर पोस्टाच्या RD नाही तर, सेविंग स्कीमच्या व्याजदराप्रमाणे व्याज मिळेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.