 
						Post Office Scheme | सुरक्षित भविष्याकरिता आत्तापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने आपली क्षमता पाहूनच गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही कमी पैसे कमवत असाल तर, तुम्ही कमी पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना देखील आणि लहान मुलांना देखील गुंतवणुकीविषयीचे महत्व पटवून दिले पाहिजे.
सध्या गुंतवणुकीचे हजारो मार्ग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट ही योजना फायद्याची ठरू शकेल. या योजनेला पोस्ट ऑफिस आरडी योजना असं देखील म्हटलं जातं. ती योजना केवळ 5 वर्षांसाठीची असते. यामध्ये फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केली तरी सुद्धा 5 वर्षांत लाखो रुपये जमा होऊ शकतात.
दररोज करा 100 रुपयांची गुंतवणूक :
तुम्हाला या योजनेवर 6.7% दराने व्याज मिळेल. लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाला 100 रुपयांची बचत करावी लागेल. दिवसाला शंभर रुपये वाचून तुम्ही महिन्याला 3000 रुपये जमा करू शकता. 3 हजार रुपये प्रमाणे तुम्ही वर्षाला 36000 यांची गुंतवणूक कराल. अशाप्रकारे तुमच्या खात्यात 5 वर्षांत एकूण 1,80,000 रुपयांची रक्कम जमा होईल. अशाप्रकारे तुम्हाला केवळ व्याजाचे 34,097 रुपये मिळतील आणि मॅच्युरिटीवर संपूर्ण मिळणाऱ्या परतावा हा 2,14,097 रुपयांचा असेल.
कर्ज घेता येईल :
तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक केली असेल तर, तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा कर्ज देखील घेऊ शकता. यासाठी तुम्हाला योजनेमध्ये गुंतवणुकीचे 12 फक्त पूर्ण करावे लागतील. कर्ज नियमानुसार तुम्ही 12 हप्ते झाल्यानंतर 50 टक्के अमाऊंटचं कर्ज घेऊ शकता. या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कर्जाचे व्याजदर हे पोस्टाच्या आरडी योजनेपेक्षा 2 टक्क्यांनी जास्त असतात. एवढेच नाही तर तुम्हाला या योजनेची मुदतवाढ देखील करून मिळेल.
प्री-मॅच्युअर क्लोजरची देखील आहे सुविधा :
समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये खातं उघडल्यास तीन वर्षांनंतर बंद देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्ही योजना मॅच्युरिटीच्या एक दिवसाआधी देखील बंद केली तर, तुम्हाला सेविंग अकाउंट एवढेच व्याज दिले जाते. सध्याच्या घडीला पोस्टाच्या बचत खात्यावर चार टक्क्याने व्याज दिले जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		