2 May 2025 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Post Office Scheme | भारतीय पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करा, तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळतील

post office monthly saving schemes

Post Office Scheme | भारतीय पोस्ट आपल्या ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. आणि त्यांचा परतावा देखील खूप आकर्षक असतो. भारतीय पोस्टने अशीच आणखी एक योजना जाहीर केली आहे जिचे नाव इंडिया पोस्ट मासिक बचत योजना असे आहे. भारतात लोकसंख्या प्रचंड आहे ही आपली एक सकारात्मक शक्ती देखील आहे. इथे लोकं नेहमी सुरक्षित गुंतवणुकीचे जास्त परतावा देणारे पर्याय शोधत असतात. येथे गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम खूप कमी असते. या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या एका अतिशय आकर्षक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव “मासिक बचत योजना” आहे.

छोट्या गुंतवकदरांसाठी एक सुरक्षित :
भारतीय पोस्ट मासिक बचत योजना छोट्या गुंतवकदरांसाठी एक सुरक्षित अशी छोटी बचत योजना आहे. सध्या या बचत योजनेत गुंतवणुकीवर 6.6 टक्के व्याज परतावा म्हणून दिला जातो. हे इतर बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या एफडीच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. आकर्षक व्याजदर हेच कारण आहे ज्यामुळे, देशातील बरेच लोक ज्यांना बचत करायची आहे ते पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न बचत योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला मासिक मूळ जमा रकमेवर परतावा म्हणून व्याज मिळतो. आता आपण पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न बचत योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ.

मासिक उत्पन्न बचत योजनेत गुंतवणूक :
भारतीय पोस्ट मासिक उत्पन्न बचत योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. ही योजना सर्वांसाठी खुली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी योजनाधरकाचे वय मर्यादा किमान 18 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी मिळतो. जर गुंतवणूकदाराचा दुर्दैवाने योजना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला, तर या परिस्थितीत संबंधित योजना खाते बंद केले जाते, आणि गुंतवणूकदाराने ठरवल्याप्रमाणे पैसे नॉमिनी व्यक्तीला दिले जातात.

तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळेल :
जर तुम्ही या योजनेत जॉईंट खाते उघडले आणि त्यात किमान 9 लाख रुपये गुंतवले, तर या प्रकरणात तुम्हाला 6.6 च्या वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण 59,400 रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दर महिन्याला व्याज म्हणून 4,950 रुपये मिळतील. आणि तुम्ही जमा केलेली मुद्दल तशीच राहील. तुमच्या मूळ जमा रकमेत कोणताही बदल होणार नाही. या योजनेत एका खात्यासाठी कमाल बचत मर्यादा 4.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, संयुक्त खात्यासाठी कमाल बचत मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post office Scheme MIS of monthly return on 21 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या