 
						Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सुरक्षित अल्पबचत योजना असून तिला भारत सरकारने हमी सुरक्षा प्रदान केली आहे. ही अल्पबचत योजना आल्या गुंतवणुकदारांना दरमहा ठराविक रक्कम खात्यात जना करण्याची सुविधा देते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर महिन्याला व्याज परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत दर महा नियमित गुंतवणूक करून या ठेवीवर निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. ही एक फायदेशीर गुंतवणूक योजना असून यातील पैसे सुरक्षित असतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जाणून घेऊ सविस्तर माहिती.
POMIS योजनेचे वैशिष्ट्ये :
* पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजने अंतर्गत खाते उघडून गुंतवणूक सुरू केल्यास पहिल्या पाच वर्षांत कोणतीही रक्कम काढता येत नाही.
* POMIS योजना खाते तुम्ही भारतातील कोणत्याही शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये स्थलांतर करू शकता. * तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने POMIS योजना खाते उघडून गुंतवणूक करू शकता.
* पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणुक करण्यासाठी किमान वयो मर्यादा 10 वर्ष आहे. वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर, अल्पवयीन व्यक्ती आपली गुंतवणूक रक्कम काढू शकतो.
* योजनेचा ठराविक लॉक-इन कालावधी पूर्ण होण्या आधी जर तुम्ही आपली गुंतवणूक रक्कम काढली तर तुम्हाला निश्चित दंड शुल्क भरावा लागेल.
* या योजनेत जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. परंतु योजनेतून मिळणारे जर व्याज उत्पन्न असेल ते आयकर कायद्याच्या करपात्र वर्गवारीत येते.
गुंतवणूकीची पात्रता :
* POMIS योजनेचा खातेदार हा भारताचा रहिवासी नागरिक असावा.
* पोस्ट ऑफीसच्या या अल्पबचत योजनेत अनिवासी भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही.
* 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक खाते उघडून या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
* तुम्ही तुमच्या 10 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने ही खाते उघडून गुंतवणूक करू शकता.
POMIS व्याज दर आणि गुंतवणूक :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. हा व्याज परतावा दर महिन्याला मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 1,000 रुपये आहे. एका आर्थिक वर्षात तुम्ही एकल खात्यात कमाल 4.5 लाख रुपये जमा करू शकता. या योजने अंतर्गत उघडलेल्या संयुक्त खात्यात कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा 9 लाख रुपये आहे.
खाते बंद करण्याच्या अटी :
इंडिया पोस्ट ऑफिस च्या POMIS योजने अंतर्गत जमा केलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून एक वर्षापूर्वी काढून घेता येणार नाही. योजना सुरू केल्याच्या एक वर्षानंतर आणि तीन वर्षांच्या आत जर तुम्ही गुंतवणूक खाते बंद केले तर मूळ जमा रकमेच्या 2 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. योजना सुरू केल्याच्या तीन वर्षांनंतर परंतु पाच वर्षापूर्वी गुंतवणूक खाते बंद केल्यास एकूण जमा रकमेच्या मुद्दलातून 1 टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागेल.
परिपक्वता कालावधी :
POMIS योजने अंतर्गत गुंतवणूक सुरू केल्याच्या दिवसापासून 5 वर्षांनंतर तुम्ही हे गुंतवणूक खाते कोणतेही दंड न भरता बंद करू शकता. योजनेच्या मॅच्युरिटी तारखेपूर्वी जर खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा अपवादात्मक परिस्थितीत हे खाते बंद करून खात्यात जमा असलेली रक्कम काढता येत. ही रक्कम गुंतवणूकदाराच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला सुपूर्द केली जाईल. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदार निश्चित रक्कम बचत करतो, आणि त्यावर त्याला दरमहा निश्चित व्याज दराने व्याज परतावा दिला जातो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		