
Post Office scheme | पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम फायदेशीर योजना चालवते. यात सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत. तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर अवघ्या काही वर्षांतच करोडपती होण्याची संधी आहे. आज आम्ही तुम्हाला ‘पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजने’बद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळते. म्हणजेच साध्या गुंतवणुकीतून तुम्ही केवळ 5 वर्षात 14 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडा
तुम्ही निवृत्त झाला असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये चालणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) तुमच्यासाठी अधिक फायद्याची आणि चांगली आहे. आपली आयुष्यभराची कमाई सुरक्षित आणि नफा देणाऱ्या ठिकाणी गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. एससीएसएसमध्ये खाते उघडण्याचे वय ६० वर्षे असावे. या योजनेत केवळ 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच खाते उघडता येईल. याशिवाय व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती योजना) घेतलेले लोकही या योजनेत खाते उघडू शकतात.
5 वर्षांत १४ लाखांहून अधिक मिळणार
ज्येष्ठ नागरिक योजनेत १० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना वार्षिक ७.४ टक्के व्याजदराने (चक्रवाढ) ५ वर्षांनंतर एकूण रक्कम १४ लाख २८ हजार ९६४ रुपये होईल. येथे तुम्हाला व्याज म्हणून 4,28,964 रुपयांचा नफा मिळत आहे.
1000 रुपयांत खाते उघडू शकता
या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम १० रुपये आहे. याशिवाय जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम तुम्ही या खात्यात ठेवू शकत नाही. याशिवाय तुमचं खातं उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही रोख रक्कम भरूनही खातं उघडू शकता. त्याचबरोबर एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर खाते उघडण्यासाठी चेक भरावा लागतो.
मॅच्युरिटी पीरियड म्हणजे काय
एससीएसएसचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे, पण गुंतवणूकदाराला हवं असेल तर ही मुदतही वाढवता येऊ शकते. इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मॅच्युरिटीनंतर तुम्ही या स्कीमला 3 वर्षांसाठी वाढवू शकता. हे वाढवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.
टॅक्स सूट
टॅक्सबद्दल बोलायचे झाले तर, जर एससीएसएस अंतर्गत तुमची व्याजाची रक्कम वार्षिक १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचा टीडीएस कापला जाऊ लागतो. मात्र, या योजनेतील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’खाली सूट देण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.