28 May 2024 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आणि बँक आरडी योजनेतील फरक जाणून घ्या, व्याज दर, कालावधी सह फायदा कुठे पहा

Post office scheme

Post Office Scheme | ज्या गुंतवणूकदारांना विना जोखमी गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी इंडिया पोस्टची आवर्ती ठेव योजना एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. जर तुम्ही जोखीममुक्त गुंतवणुकीसाठी आरडी खाते उघदू इच्छित असाल, पण तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि बँक आरडी यापैकी एक निवडण्यात अडचण होत असेल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला बँक आरडी आणि पोस्ट ऑफिस आरडीबद्दल सविस्तर माहिती देणार अहित, जेणेकरून तुम्ही यातील बेस्ट RD स्किम निवडून त्यात गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी योजना :
इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे आपल्या ग्राहकांसाठी आरडी योजना राबवली जाते. ही पोस्ट ऑफिसतर्फे राबवली जाणार एक बचत योजना आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट ही मध्यम मुदतीची बचत योजना म्हणून सुरू करण्यात आली होती. ठेवीदार पोस्ट ऑफीसच्या या योजनेत किमान पाच वर्षे काळासाठी गुंतवणूक करू शकतात.

पोस्ट ऑफिस आरडीची वैशिष्ट्ये :
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही 5 वर्षांचा मुदत कालावधी असलेली एक मासिक गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात लहान गुंतवणूकदार किमान 100 रुपये पासून गुंतवणूक करण्याची सुविधा देते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफीसमधे अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही आरडी खाते उघडता येते. एकदा जेर का तुम्ही या आरडी स्कीममध्ये मासिक गुंतवणूक सुरू केली , आणि पैसे जमा करण्यात अयशस्वी झालात तर तुमच्याकडून प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपये डीफॉल्ट शुल्क म्हणून आकारले जाईल. एका वर्षानंतर तुम्हाला 50 टक्के पर्यंत आंशिक पैसे काढण्याची मुभा दिली जाईल.

बँक आरडी स्कीम :
ही देखील एक प्रकारची आवर्ती ठेव योजना आहे. आरडी स्कीम एक गुंतवणूक पर्याय आहे, ज्यात लोक दर महा ठराविक रक्कम आपल्या खात्यात जमा करून बचत करु शकतात. आरडी स्कीम लोकांना नियमित बचत करण्याची आणि चांगला परतावा मिळविण्याची संधी देते. नियमित ठेवीवरील चांगल्या व्याज दरामुळे बरेचदा लोक आरडी स्कीममध्ये आपले पैसे गुंतवणूक करतात.

बँक आरडी योजनेचे वैशिष्ट्ये :
बँक आरडी योजनेत गुंतवणूक करण्याचा फायदा असा आहे की, तुम्ही तुमचे आरडी खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकता. बाकीच्या आरडी स्कीम मध्ये मुदत कालावधी जास्त आहे, त्यात तुम्हाला सहा महिने ते दहा वर्षांपर्यंत किमान ठेव कालावधी दिला जातो. शक्यतो आरडी स्कीम वरचा व्याजदर हा मुदत ठेवींच्या व्याजदरा एवढाच असतो. आरडी ठेवीवर तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा ही दिली जाते. अडचणीच्या काळात जमा रकमेपैकी 80 ते 90 टक्के रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस आरडी Vs बँक आरडी :
पोस्ट ऑफिसतर्फे ऑफर केल्या जाणाऱ्या आरडी खात्याचा कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. बँकांतर्फे ऑफर केल्या जाणाऱ्या आरडी स्कीमचा कालावधी किमान 1 वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत असतो. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यावर मिळणारे व्याजदर दर तिमाहीत सुधारित केले जातात. परंतु बँकाच्या आरडी खात्यावरील व्याज दर नियमित अंतराने सुधारित केले जात नाही. बँकांमध्ये, तुम्ही हवे तोपर्यंत आरडी खात्याचे नूतनीकरण करू शकता, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये, आरडीचा कार्यकाळ फक्त 5 वर्ष देण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस आरडी खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काही कालावधी नंतर काढता येते, आणि बँकांतर्फे ऑफर केल्या जाणाऱ्या आरडी डिपॉझिटवर तुम्हाला 95 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते, किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधाही दिली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office scheme Of Recurring deposit for investment and huge interest Return on 07 November 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x