 
						Post Office Scheme | पोस्टाच्या अशा विविध योजना आहेत ज्यामधून महिलांना चांगली बचत करून बक्कळ पैसे कमवता येऊ शकतात. पोस्ट ऑफिस अंतर्गत महिलांसाठी स्त्रीच्या सशक्तिकरणासाठी पोस्ट ऑफिस महिलांच्या पाठीशी सज्ज आहे. कमी कालावधीत देखील बंपर परतावा मिळवून देणाऱ्या महिलांसाठीच्या या खास योजनांमध्ये तुम्ही देखील ठराविक पैशांची गुंतवणूक करून लखपती बनू शकता. चला तर जाणून घेऊया पोस्टाच्या या योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या.
सुकन्या समृद्धी योजना :
पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आतापर्यंत हजारो महिलांनी योजनेत गुंतवणुकीची पसंती दर्शवली आहे. कारण की या योजनेचे वार्षिक व्याजदर 8.2% आहे. सुकन्या समृद्धी योजनेत कोणतीही महिला 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकते. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की, योजनेमध्ये कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते परंतु त्या मुलीच्या 10 वर्षांच्या आतच तिचे खाते तुम्हाला पोस्टामध्ये उघडावे लागेल. तुमच्या मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षानंतर म्हणजेच योजना मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील.
पोस्ट ऑफिस मंथली स्कीम :
पोस्टाची मंथली इन्कम योजना देखील महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेत सर्वसामान्य तसेच गरीब प्रवर्गातील महिला देखील आपल्या मुलींसाठी किंवा स्वतःसाठी गुंतवणूक करू शकतात. कारण की यामध्ये केवळ शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू होते. ही योजना महिलांना वार्षिक आधारावर 7.4% व्याज देते. त्यामुळे मॅच्युरिटीपर्यंत बंपर लाभ मिळतो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र :
सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि खास करून महिलांसाठी पोस्टाची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देखील अत्यंत लाभदायी ठरू शकते. या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 लाखांची रक्कम गुंतवू शकता. या योजनेचा सध्या 7.5% वार्षिक व्याजदर दिले जाते. व्याजदराची रक्कम जास्त असल्यामुळे महिलांना कमी पैशांत आणि कमी बचतीत देखील भरघोस लाभ मिळतो. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे समजा एखाद्या महिलेने 1 वर्ष योजनेमध्ये पैसे गुंतवले तर, गुंतवलेले रक्कमेपैकी 40% रक्कम गरजेवेळी काढून घेऊ शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		