
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून एक भन्नाट ऑफर आली आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत अगदी कोणताही व्यक्ती इन्व्हेस्ट करू शकतो. या स्किमच नाव आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट. जिला टाईम डिपॉझिट स्कीम असं देखील म्हटलं जातं. ही स्कीम स्मॉल सेविंग सेवेच्या अंतर्गत चालवली जाते. या योजनेची एक सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये एकसाथ पैसे गुंतवू शकता. यामध्ये वेळोवेळी पैसे जोडले जातात. या योजनेला FD असं देखील म्हटलं जातं.
या योजनेमध्ये जो कोणी इन्वेस्टर इन्व्हेस्ट करेल त्याला चांगलं व्याज देखील दिल जाणार आहे. एवढंच नाही तर इन्कमटॅक्स बेनिफिट्स देखील मिळतील. अशातच टाईम डिपॉझिटच्या अंतर्गत एकूण चार प्रकारचे टेन्योर सादर केले जातात. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटच्या अंतर्गत एका वर्षासाठी 6.9% व्याज दिलं जातं. दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिटसाठी 7.0% ने व्याज दिलं जातं. त्याचबरोबर तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिटसाठी 7.1% तर, 7.5% एवढ व्याज पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिटसाठी दिलं जातं.
फक्त व्याजानेच होईल 4.5 लाखांची कमाई
या योजनेअंतर्गत तुम्ही प्रत्येक दिवसाला 2,778 एवढे रुपये वाचवत असाल आणि एका वर्षानंतर दहा लाख रुपये एकदाच इन्वेस्ट करत असाल तर, तुम्हाला या पैशांचं भारीच व्याज मिळेल. तुम्हाला पाच वर्षांमध्ये फक्त व्याजाचे 4,49,948 एवढे रुपये मिळतील आणि संपूर्ण पाच वर्षांचं टोटल काउंटिंग केलं तर, तुम्ही तब्बल 14,49,948 रुपयांचे मानकरी व्हाल.
पोस्ट ऑफिस एटीडी अंतर्गत तीन व्यक्ती जॉईंट किंवा सिंगल अकाउंट ओपन करू शकतात. दरम्यान या योजनेमध्ये 100 च्या पटीत एकूण 1000 रुपये तुम्ही गुंतवू शकता.
या योजनेमध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आयकर कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची वार्षिक सूट दिली जाते. परंतु सहा महिने होण्याआधी तुम्ही या योजनेचे पैसे काढू शकत नाही.