24 January 2025 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत मोठे संकेत, ब्रोकरेज फर्मने दिला महत्वाचा सल्ला - NSE: TATATECH
x

PPF Investment | पीपीएफ गुंतवणूकही तुम्हाला लाखोंचा निधी देऊ शकते | अनेक फायदे जाणून घ्या

PPF Investment

PPF Investment | तुम्ही जर गुंतवणुकीचं नियोजन करत असाल आणि नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील, पण चांगला परतावाही मिळेल. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक करून भविष्यात तुम्ही तुमचा कॉर्पस तयार करू शकता. येथे तुम्ही कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत चांगला नफा कसा कमावू शकतो, हे जाणून घेऊया.

तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता:
पीपीएफमधील गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. या अकाउंटमध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि मासिक गुंतवणूक 12500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. पीपीएफची मॅच्युरिटी 15 वर्षांची असते आणि ती तुम्ही 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.

किती व्याज मिळतं :
केंद्र सरकारच्या या योजनेत सध्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज मिळते. मार्चनंतर या योजनेत व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या नावावर किंवा अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकता.

या योजनेत गुंतवणूक करून करोडपती कसे बनवावे :
या योजनेत गुंतवणूक करून कोट्यधीश व्हायचे असेल तर किमान २५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. दीड लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीतून ३७ लाख ५० हजार रुपये जमा झाले असते. यावर वार्षिक ७.१ टक्के दराने ६५,५८,०१२ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम १,०३,०८,०१२ रुपये असेल.

करसवलतीचाही फायदा :
या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर करसवलतीचा लाभही इथे मिळतो. आयकर कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा लाभ घेता येईल. येथे गुंतवणूक करणे सुरक्षित आहे, तसेच येथे गुंतवणुकीवर दरवर्षी चांगला परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Investment benefits check details 02 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x