
PPF Investment | आपल्या देशात महागाईने थैमान घातलं आहे. अशातच सामान्य प्रवर्गातील व्यक्ती आपल्या भविष्यासाठी आत्तापासूनच पैशांची बचत करण्यास शिकत आहेत. काही लोक विविध फंडांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान कोणताही व्यक्ती आपल्याला मजबूत परतावा त्याचबरोबर सुरक्षितता प्रदान करणाऱ्या योजना शोधत असतो.
तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ योजना फायदेशीर ठरू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या योजनेत अगदी 100 रुपयांची गुंतवणूक करून देखील 10 लाखांचा फंड तयार करू शकता.
योजनेचा कालावधी आणि व्याजदर :
पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असतो. तशा बाजारात शेअर बाजाराशी निगडित बऱ्याच गुंतवणूक योजना आहेत गौतम परतावा मिळवून देतात परंतु त्यामधून पीपीएफ ही सरकारची नावाजलेली आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे. यामध्ये तुम्हाला दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्यास मदत मिळते. एवढेच नाही तर पीपीएफ गुंतवणुकीत कोणत्याही प्रकारची जोखीम देखील पाहायला मिळत नाही.
या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 7% टक्क्यांहून अधिक परतावा मिळतो. पंधरा वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर एखाद्या गुंतवणूकदाराला आणखीन योजना वाढवायची असेल तर तो 5 वर्षांच्या कालावधीनुसार योजना वाढवून पैशांची गुंतवणूक सातत्याने सुरू ठेवू शकतो. गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा हा कंपाऊंडिंग व्याज त्याचबरोबर चक्रवाढ व्याजासह दिला जातो.
योजनेतून 10 लाखांची रक्कम कशी मिळवाल :
15 वर्षांच्या पीपीएफ योजनेत 10 लाखांची रक्कम तयार करायची असेल तर, तुम्ही प्रत्येक दिवसाला 100 रुपयांची बचत करून महिन्याला 3000 रुपये साठवू शकता. प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांचे गुंतवणूक करून तुम्ही एका वर्षामध्ये 36000 रुपयांची रक्कम साठवता. दरम्यान 15 वर्षांच्या काळात तुमच्या खात्यात 9,76,370 रुपयांची रक्कम तयार होईल. यामधील 15 वर्षांत तुम्ही गुंतवलेली रक्कम 5.40 लाख रुपये असेल आणि सरकारतर्फे व्याजाने मिळालेले पैसे 4,36,370 रुपये असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.