25 April 2024 1:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल
x

PPF Scheme | होय! PPF योजनेत 12,500 रुपये जमा करून करोड मध्ये परतावा मिळेल, योजनेचे गणित समजून घ्या

PPF Scheme

PPF Scheme | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी हमखास परतावा कमावून देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर, PFF योजना तुमच्या खूप फायद्याची ठरू शकते. आज या लेखात आपण PPF योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. PPF योजनेत तुम्‍हाला दीर्घकाळात करोडपती बनवण्याची क्षमता आहे. पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना भारतात दीर्घकाळ गुंतवणूक आणि हमखास परतावा देण्यात फेमस आहे.

दीर्घकालीन गुंतवणुक करून हमखास परतावा कमावण्यासाठी पीपीएफ योजना अतिशय सुरक्षित गुंतवणूक योजना मानली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला फक्त हमी परतावा नाही कर सूटही मिळते. या योजनेंतर्गत सध्या 7.1 टक्के वार्षिक या दराने चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला जातो. ही योजना दीर्घकाळात चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक वाढवते.

पीपीएफ योजनेवर सुरक्षा हमी :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजनेत आपण जी गुंतवणूक करतो, त्यावर भारत सरकार सुरक्षा हमी देते. PPF योजना पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केले जाते आणि त्यावरील व्याज देखील सरकार दर तिमाही मध्ये स्वतः ठरवते. याचा अर्थ या योजनेत जमा केलेले सर्व पैसे भारत सरकारच्या सुरक्षित हातात असतात आणि मुदतपूर्तीच्या वेळी तुम्हाला त्यावर खात्रीशीर परतावा देखील मिळतो.

गुंतवणूकीची पात्रता :
पीपीएफ योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. फक्त 500 रुपये जमा करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन अर्ज करून किंवा ऑनलाईन पद्धतीने पीपीएफ खाते उघडू शकता. एका आर्थिक वर्षात तुमच्या PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. आणि PPF खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला त्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील.

तुम्ही PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर गरज असल्यास कर्ज देखील मिळवू शकता. ही योजना तुम्हाला कर्ज आणि कर सवलत असे दोन्ही लाभ देते. मात्र हा लाभ मिळविण्यासाठी तुमचे PPF खाते किमान 5 वर्षे जुने असणे आवश्यक आहे. त्याच वेळी ही योजना EEE श्रेणी अंतर्गत येत असल्याने गुंतवणूकदारांना कर सवलत लाभ दिला जातो. म्हणजेच पीपीएफ फंडात गुंतवलेल्या रकमेवर जो व्याज परतावा मिळतो, त्यावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. याशिवाय, पीपीएफ खात्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही न्यायालयीन आदेश, कर्ज किंवा इतर कोणत्याही दायित्वासाठी PPF खाते जप्त करता येत नाही.

PPF मध्ये गुंतवणूक करून करोडपती व्हा :
जर तुम्हाला PPF योजनेत नियमित गुंतवणुक करून करोडपती व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला वार्षिक 1.5 लाख रुपये म्हणजेच दरमहा किमान 12,500 रुपये PPF खात्यात जमा करावे लागतील. PPF खात्यात नियमित 25 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला त्यावर चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळेल आणि, मुदतपूर्तीच्या वेळी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटीहून अधिक झाले असेल. तुम्हाला या व्याज परताव्यावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF Scheme For Long term Investment for good return check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x