 
						PPF Scheme | पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’. या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी आपले पैसे गुंतवून नफा कमवला आहे. दरम्यान पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. आपल्या भारतातील व्यक्ती सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांना जास्त महत्त्व देतात. पीपीएफसारख्या पोस्टाच्या योजनांमध्ये त्याचबरोबर बँक एफडीमध्ये आणि आरडी योजनांमध्ये पैसे लाखोंच्या घरात कमाई करू शकता.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारद्वारे चालवली जाणारी योजना बहुतांश नोकरदार वर्ग या पीपीएफ योजनेत आपले पैसे दुप्पटीने वाढण्यासाठी गुंतवण्याचा विचार करत असतात. पीपीएफ योजनेचे व्याजदर त्याचबरोबर इतर सर्व माहिती आज आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत.
पीपीएफ योजना कशा पद्धतीने काम करते :
1. तुम्हाला देखील पब्लिक प्रोव्हीडेंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला थेट बँकेत जाऊन किंवा पोस्टाच्या कार्यालयात जाऊन खातं उघडावं लागेल. तुम्हाला पीपीएफ योजनेत पाचशे रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत पैशांची गुंतवणूक करता येते.
2. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात तुम्ही मासिक आधारावर गुंतवणूक करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला एकरक्कमी रक्कम गुंतवणुकीची मुभा देखील देण्यात येते. या योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा दिला जातो. म्हणजेच 15 वर्षानंतर तुमची योजना मॅच्युअर होते.
3. पंधरा वर्षांच्या कार्यकाळाची ही योजना असून तुम्ही आणखीन 5-5 वर्षांच्या टाईम पिरियड मध्ये योजना वाढवू शकता. याचाच अर्थ असा की या योजनेचा टाईम पिरियड हा फ्लेक्झिबल आहे.
4. योजनेच्या व्याजदराविषयी सांगायचे झाल्यास पीपीएफ योजना तुम्हाला वार्षिक आधारावर 7.10% दराने व्याजदर देते. लॉंग टर्म एफडीच्या तुलनेत पीपीएफ योजना तुम्हाला जास्तीचे व्याजदर मिळवून देते.
अशा पद्धतीने मिळतील 68 लाखांची रक्कम :
समजा पीपीएफ खात्यात एखादा गुंतवणूकदार 25 वर्षांच्या कार्यकाळासाठी एका वर्षात 1 लाखांची रक्कम गुंतवत असेल तर, 25 वर्षांच्या कार्यकाळात त्याच्या खात्यामध्ये 68 लाखांची रक्कम तयार होईल. जमा झालेला रक्कमेवर 7.10% व्याजदर मिळेल. सारखेच व्याजदर सातत्याने मिळत राहिले तर, 25 वर्षांमध्ये गुंतवणूकदाराजवळ 68 लाख 72 हजार 10 रूपये मिळतील.
गुंतवलेला रक्कमेवर मिळणार कर्ज :
पीपीएफ खात्याची योजना तुम्हाला एक विशेष सुविधा उपलब्ध करून देते. यामध्ये तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेवर कर्ज देखील मिळते. तुम्ही जेवढी रक्कम गुंतवली असेल त्या रक्कमेच्या 25% रक्कम म्हणून तुम्हाला कर्जस्वरूपी दिली जाते. दरम्यान तुमच्या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली असतील तर जमा रक्कमेच्या 50% रक्कम तुम्हाला काढता येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		