15 December 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्र पोलीस विभागात 7000 जागांसाठी भरती, सविस्तर माहिती प्रसिद्ध

Maharashtra Police Recruitment 2022

Maharashtra Police Recruitment 2022 ​​| महाराष्ट्रात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश आले आहेत. राज्य शासनाने काल (बुधवारी) याबाबत निर्णय जाहीर केला. त्याच बरोबर या अगोदर सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड काळात उमेदवारांना गर्दीत कोरोनाची लागण होऊ नये तसेच, उमेदवार हे विविध जिल्ह्यांमधून येतं असल्याने एखाद्याला लागण झाल्यास ती इतर जिल्ह्यात देखील पसरण्याची शक्यता असल्याने तत्कालीन सरकारे उमेदवारांच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून जाहीर झालेल्या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून देशात आणि जगभरात कोरोनासंबधित स्थिती सुधारली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात आता बरेच पोलीस कर्मचारी सेवानिवृत झाले आहेत आणि अनेकजण निवृत्तीच्या जवळ असल्याने गृह खात्याला नवीन मनुष्य बळाची आवश्यकत आहे. त्यासाठी अजून 7000 पोलीस शिपाईची भरती लवकर करण्यात येइल. 7000 पदांपैकी २५२७ जागा ओक्टोम्बर व नोव्हेंबर महिन्यात भरल्या जाणार आहेत.

7231 पदे भरती प्रक्रियेने भरण्यास मान्यता :
2022 मध्ये पोलीस शिपाई पदात रिक्त असणारी एकूण 7231 पदे भरती प्रक्रियेने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यापैकी नक्षलग्रहस्त भागातील अत्यावश्यक असणारी पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथील 289 पदे व समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, वडसा देसाईगंज, गडचिरोली येथील 54 पदे भरण्याबाबत शासनाने विशेष बाब म्हणून सन 2019 च्या भरतीसोबत भरण्यास मान्यता दिली होती.

उर्वरित 6888 इतके पदे भरण्याचा निर्णय :
त्यामुळे वरील पदे वगळून उर्वरित 6888 इतके पदे भरण्याचा निर्णय झालं आहे. अँप्लिकेशन प्रोसससिंग सिस्टिम तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासण्याच्या MAHAIT विभागास देण्यात आले असून, सदरचे कामकाज सप्टेंबर अखेर प्रयन्त पूर्ण झाल्या नंतर पोलीस शिपाई प्रक्रिया माहे ओक्टोम्बर 2022 च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे प्रस्थापित केले आहे. पोलीस भरती साठी संपूर्ण जाहिरात ओक्टोम्बर महिन्यात येणार आहे व ऑनलाईन अर्ज याच महिनात भरायला सुरु होईल. सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेल्या पदांची तपशील खालील प्रमाणे आहे.

Police Bharti 2022

जाहिरात परिपत्रक वाचण्यासाठी – येथे क्लिक करा

नवीन पोलीस भरती GR पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Police Recruitment 2022 for 12527 seats check details 22 September 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Police Recruitment 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x