27 July 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

पोलीस भरतीसाठी मेहनत करताय? मग महाराष्ट्रनामा'वर करा लेखी परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास

Sarkari Naukri, Mahagov, Maha Gov, MPSC World, MPSCworld, MPSC Kida, MPSCKida, Police Bharti, Talathi Bharti, UPSC, MPSC Online Study

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचंसरकार स्थापन झाल्यावर जाहीर झालेली ही पहिली भरती आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रातुन लाखो तरुण आणि तरुणींनी मैदानी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने प्रचंड अभ्यासाची गरज आहे, अन्यथा सर्व मेहनत वाया जाईल.

तत्पूर्वी फडणवीस सरकारने केलेल्या नव्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र, या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि राज्यभर मोठीं आंदोलनं झाली आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने त्यासंदर्भात देखील घडामोडी घडू लागल्या आहेत.

त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आता, राज्य सरकारकडून १०१९ पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती काढण्यात आली आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही, गृहमंत्रीही निश्चित नाही. तरीही, सरकारच्या गृहविभागाकडून १०१९ पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना, आर.आर. पाटील यांच्या काळातील भरतीप्रमाणे मोठ्या भरतीची जाहिरात निघावी, अशी अपेक्षा नव्या सरकारकडून आहे. वास्तविक जागा कितीही असल्या तरी मुलांना प्रचंड स्पर्धा आणि मेहनत असते यामध्ये दुमत नाही. त्यासाठी लाखो मुलं वर्षानुवर्षे मैदानी आणि लेखी परीक्षेची तयारी करत असतात.

त्यालाच अनुसरून महाराष्ट्रनामा न्यूज’ने राज्यातील तरुण-तरुणींसाठी मोफत ऑनलाईन अभ्यासाची सोय करून दिली असून, राज्यभरातून हजारो तरुण या सुविधांचा फायदा घेत आहेत. तरी आपण सुद्धा त्याच तयारीत असाल तर जास्तीत जास्त लेखी परीक्षेचा सराव करावा आणि त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सातत्याने अभ्यास सुरु ठेवावा.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x