27 March 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स जबरदस्त घसरले, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Reliance Power Share Price | 39 रुपयांच्या रिलायन्स पॉवर शेअरबाबत अपडेट, आनंद राठी ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: RPOWER Adani Power Share Price | ICICI सिक्युरिटीज बुलिश, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER PPF Scheme Investment | हमखास गॅरेंटेड 34,36,005 रुपये परतावा देईल PPF योजना, बिनधास्त बचत करा, फायदाच फायदा EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPF चे 86,90,310 रुपये जमा होणार, तुमचा पगार किती? फायद्याची अपडेट Mirae Asset Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको? फक्त 11 महिन्यात 103% परतावा देतोय हा फंड, संधी सोडू नका 8th Pay Commission | 8वां वेतन आयोग केव्हा लागू होणार? पेंशनर्स अणि कर्मचाऱ्यांना होणार फायदा, रक्कम जाणून घ्या
x

Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार

Post GDS Recruitment 2025

Post GDS Recruitment | पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण टपाल सेवकांच्या 21 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार indiapostgdsonline.gov.in टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. येत्या सोमवारी, 10 फेब्रुवारी रोजी नोंदणी खिडकी उघडण्यात आली असून सुमारे 21 दिवस ती खुली राहणार आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवार 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

महाराष्ट्रासह 23 सर्कलमध्ये ग्रामीण टपाल सेवकांची जिल्हानिहाय भरती
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, हरियाणा 23 सर्कलमध्ये ग्रामीण टपाल सेवकांची भरती जिल्हानिहाय केली जाईल. जे उमेदवार इंडिया पोस्ट जीडीएस रिक्ति साठी पात्र आहेत ते इंडिया पोस्ट indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या पोर्टलनुसार, अर्ज भरताना एखाद्या उमेदवाराने चूक केल्यास त्यांना दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी टपाल विभाग ६ मार्च ते ८ मार्च २०२५ या कालावधीत दुरुस्ती खिडकी उघडणार आहे. जेव्हा विंडो उघडेल, तेव्हा उमेदवार आपल्या अर्जांमध्ये दुरुस्ती करू शकतील.

पगार किती असेल?
या भरतीच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांच्या 21,413 पदांसाठी नियुक्त्या केल्या जाणार आहेत. बीपीएम पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 ते 29,380 रुपये वेतन मिळेल. दरम्यान, एबीपीएम किंवा डाक सेवक पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 24,470 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

कोण अर्ज करू शकतात
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक, हायस्कूल किंवा दहावी उत्तीर्ण उमेदवार ग्रामीण टपाल सेवा पदाच्या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. उमेदवाराने दहावीत गणित आणि इंग्रजी या विषयात उत्तीर्ण गुण मिळवलेले असावेत. उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

अर्ज कसा करावा
* इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – indiapostgdsonline.gov.in.
* नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
* फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पेमेंट करा.
* फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआऊट घ्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post GDS Recruitment 2025(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या