21 January 2025 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Sarkari Naukri | सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी; पगार 55000, अर्ज प्रक्रिया आणि इतर डिटेल्स जाणून घ्या - Marathi News

Sarkari Naukri

Sarkari Naukri | सरकारी किंवा शासकीय क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण पाहतो. आपल्या नोकरी पुढे सरकारी नोकरी हा शिक्का लागण्यासाठी अनेकजण प्रचंड मेहनत देखील घेत आहेत. बऱ्याच व्यक्तींना सरकारी नोकरी म्हणजेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतील असं वाटतं. परंतु आपल्या भारत देशात अशा अनेक सरकारी कंपन्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी मिळू शकते.

कुठे कराल अर्ज :

सध्या सरकारी कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर आणि ट्रेनी इंजिनीयर या पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नावाची सरकारी कंपनी आहे. या पदासाठी ट्रेनी इंजिनियर पदासाठी 36 जागा तर, प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी 12 जागा उपलब्ध आहेत. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास bel-India.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर महिन्याच्या 11 तारखेपर्यंत दिली गेली आहे.

पात्रता जाणून घ्या :

या भरतीसाठी उमेदवाराने बीएससी, बीटेक आणि बी. ई यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर 4 वर्षांचा कॉम्प्युटर सायन्स कोर्स पूर्ण केलेला असावा. या भरतीसाठी फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात परंतु फ्रेशर्स केवळ ट्रेनि पदासाठीच अर्ज करण्यास पात्र आहेत. इंजिनीयर पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराकडे किमान 2 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी :

प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 वर्ष दिले गेले आहे तर, ट्रेनि प्रोजेक्ट भरतीसाठी वयाची अट 28 वर्ष दिली गेली आहे. भरतीमधील निवड प्रक्रिया लेखी परीक्षेमार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान नोकरी लागल्यानंतर उमेदवाराला 30,000 ते 55,000 रुपयांचा पगार देखील मिळणार आहे.

Latest Marathi News | Sarkari Naukari 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x