11 April 2021 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर

Kitchen tips, benefits, Lemon peel

मुंबई, २१ फेब्रुवारी: लिंबू हे खूपच उपयोगी पडणारं फळ आहे. लिंबाचा वापर जेवणाबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. मात्र आपल्यापैकी अनेकजण लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची साल फेकून देतात. मात्र या सालीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता ते कसं हे पाहू.

BhagyaVivah Marathi Matrimonial
  • लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.
  • लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करू शकता. फेसपॅकमध्ये तिचा वापर करू शकता.
  • लिंबाची साल निट साफ करून तुम्ही खारवूनही ठेवू शकता. अनेक देशांत मिठाच्या पाण्यात लिंबाची साल खारवून ठेवतात. खारवलेली साल रुचकर लागते.

त्याचप्रमाणे लिंबाच्या सालीनं तुम्ही पायाची, हाताची नखं साफ करू शकता. लिंबाच्या सालीनं नखं घासल्यानं ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.

  • गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडं मध लावून लिंबाच्या सालीनं त्या भागावर मसाज केला की काळवंडलेपणा निघून जातो.
  • घरात मुंग्या येत असतील तर त्यांच्या मार्गात लिंबाची साल ठेवावी, लिंबाला येणाऱ्या तीव्र वासामुळे मुंग्या येत नाही.
  • फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेन तर लिंबाच्या साली ठेवाव्या यामुळे दुर्गंधी कमी होते.
  • शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.

 

News English Summary: Lemon is a very useful fruit. Lemon is used in food as well as in cosmetics. But many of us throw away the peel of a lemon after it has been used. But let’s see how you can use this year in many ways.

News English Title: Kitchen tips benefits of lemon peel news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x