13 November 2019 11:59 PM
अँप डाउनलोड

आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८: बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पांघलची सुवर्ण कमाई

जकार्ता : जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या अमित पांघलने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

अमित पांघलने अंतिम फेरीत बाजी मारत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवला मात देत भारतासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारी तसेच अनुभवाने हसनबॉय हा अमित पांघल पेक्षा अनेक पटीने उजवा खेळाडू होता, तरीही अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला आश्चर्यचकीत करुन टाकलं आणि देशासाठी सुवर्ण कामगिरी केली आहे.

दरम्यान, काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमितने फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर विजय प्राप्त केला होता. त्याआधी भारताच्या विकास क्रिशनला उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे अमित पांघल’कडून भारताच्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि भारतीयांच्या त्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या