28 September 2020 7:44 PM
अँप डाउनलोड

India vs NZ T20 : भारताची न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून मात

ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचा भेदक मारा तसेच फलंदाजांच्या दमदार सलामीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना खिशात घातला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावांच लक्ष दिलं होतं. दरम्यान, भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला आणि यजमान्यांना धूळ चारली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारताच्या कृणाल पंड्याने ३ फलंदाजांना तंबूत धाडत न्यूझीलंडच्या डावाला मोठं खिंडार पाडले. त्याला कृणाल आणि अन्य गोलंदाजांनी सुद्धा उत्तम साथ दिली. दरम्यान, न्यूझीलंडकडून कॉलिन डी’ ग्रँडहोमने किवींचा डाव सावरत अर्धशतकी खेळी साकारली.

न्यूझीलंडच्या १५९ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली फटकेबाजी केली. रोहितने यावेळी २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. धवनने ३० धावा करत रोहितला उत्तम साथ दिली आणि भारताचा विजय सोपा केला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x