23 September 2021 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Tokyo Paralympics 2020 | प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक

Tokyo Paralympics 2020

टोकियो, ०४ सप्टेंबर | टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी डबल धमाका करत SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. प्रमोदने सुवर्ण तर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Tokyo Paralympics 2020, प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक – Tokyo Paralympics 2020 Pramod Bhagat Clinches Gold And Manoj Sarkar Wins Bronze In Badminton Event :

भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव केला. याच SL3 प्रकारात भारतासाठी मनोज सरकारने कांस्यपदक जिंकले. त्याने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात जपानच्या देसुके फोजिहाराचा 22-20, 21-13 असा पराभव केला. प्रमोदच्या आधी मनीष नरवालने सुवर्ण आणि सिंहराज अधानाने एसएच -1 श्रेणी 50 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये रौप्य पदक जिंकले.

पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी खूप चांगली राहिली. प्रमोद व्यतिरिक्त, एसएल -4 मधील नोएडाचे डीएम सुहास यतीराज आणि एसएच -6 प्रकारातील कृष्णा नगर यांनीही अंतिम फेरी गाठून पदके निश्चित केली आहे.

कृष्णाने उपांत्य फेरीत वर्ल्ड नंबर-5 ला हरवले:
कृष्णाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कोम्ब्सचा 21-10, 21-11 असा पराभव केला. यासह त्याने बॅडमिंटनमध्ये किमान तिसरे रौप्य पदक निश्चित केले आहे. यासह तीन खेळाडूंनी बॅडमिंटनची अंतिम फेरी गाठली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Paralympics 2020 Pramod Bhagat Clinches Gold And Manoj Sarkar Wins Bronze In Badminton Event.

हॅशटॅग्स

Tokyo Paralympics 2020(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x