1 April 2023 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का? Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
x

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | आपण आगामी वर्षांसाठी “जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेअर टार्गेट प्राईस” शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहात. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक प्राइस टार्गेटबद्दल जाणून घेण्यापूर्वी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची पार्श्वभूमी, टेक्निकल फंडामेंटल इत्यादी समजून घेऊया. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Infrastructure Share Price | GTL Infrastructure Stock Price | GTL Infra Share Price | GTL Infra Stock Price | BSE 532775 | NSE GTLINFRA)

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल :
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही एक कंपनी आहे जी वायरलेस टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे देण्यात येणारे टेलिकॉम टॉवर्स आणि इतर कम्युनिकेशन स्ट्रक्चर डेव्हेलप, डिप्लॉय आणि मॅनेजमेंट करते. त्यांनी भारतातील सर्व २२ सर्कलमध्ये सुमारे २६० टेलिकॉम टॉवर्स तैनात केले आहेत. मनोज तिरोडकर हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एकूण प्रवासात काही मैलाचे दगड गाठले आहेत जसे की त्यांना 2016 मध्ये ईटी टेलिकॉम पुरस्कार मिळाले आहेत, 2017 मध्ये ते डिजिटल इंडिया समिटचे प्रमुख प्रायोजक होते.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे फंडामेंटल्स
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची फंडामेंटल्स पाहूया, ज्याच्या आधारे आपण तुम्हाला कंपनीचा अंदाज आणि या क्षेत्रातील कौशल्याची स्पष्टता येऊ शकते.

१. चालू मार्केट कॅप (Current Market Cap) – जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे सध्याचे मार्केट कॅप २५ जानेवारी २०२३ रोजी 1,394 कोटी रुपये आहे.
२. पी /ई गुणोत्तर (P/E Ratio) – जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे सध्याचे मूल्य आणि उत्पन्न गुणोत्तर ₹0 आहे.
३. ईव्ही / एबिटडा (EV/EBITDA) – 12.64
४. विक्री वाढ (Sales Growth) – जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची विक्री वाढ -०.५१% आहे.
५. प्रॉफिट ग्रोथ (Profit Growth) – या कालावधीत प्रॉफिट ग्रोथ 31.81% च्या आसपास असते.

कंपनीबद्दल नकारात्मक मुद्दे :
१. कंपनीवर तब्बल 4,692 कोटी रुपयांचं कर्ज आहे.
२. प्रोमोटर्स होल्डिंग केवळ 3.32% शिल्लक असून ती सुद्धा 100% मॉर्गेज ठेवण्यात आलं आहे.
३. कंपनीचा व्याज कव्हरेज रेशो कमी आहे.
४. कंपनीने गेल्या पाच वर्षांत -८.५२% सेल्स नोंदवला आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेयर प्राइस टार्गेट 2023
मागील वर्षाच्या चार्टचे विश्लेषण करताना विश्लेषकांना असे आढळले की २००८ मध्ये या शेअरने १०० रुपयांचा उच्चांक गाठला होता, खराब प्रोजेक्ट प्लॅनमुळे हा शेअर आता पेनी स्टॉक बनून राहिला आहे, पण त्याला इतिहासात इतर आर्थिक आपत्ती देखील कारणीभूत होत्या, आता विश्लेषक असा अंदाज वर्तवत आहेत की हा शेअर 5G मुळे पुढे सरकेल आणि त्याच्या मूळ किंमतीवर परत येईल, चार्ट पाहिल्यावर आपण पाहू शकतो की २०२३ चे टार्गेट ३.२ रुपयांपर्यंत असू शकते.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेयर प्राइस टार्गेट 2024
जीटीएल इन्फ्रा कंपनीचा व्यवसाय 5G तंत्रज्ञानासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे. भारतात 5जीचे काम सुरू होताना दिसताच तुम्हाला या कंपनीच्या व्यवसायातही वेगाने वाढ होताना दिसू शकते. कंपनीच्या ग्राहकांवर नजर टाकली तर जिओ, एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल अशा टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित सर्व कंपन्यांचे ग्राहक दिसतात. ज्यामुळे कंपनी येत्या काळात या सर्व कंपन्यांसाठी 5जी टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करताना दिसत आहे. येत्या काळात कंपनीआपला व्यवसाय वाढवू शकली तर चे टार्गेट 4.1 रुपयांपर्यंत असू शकते.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेयर प्राइस टार्गेट 2025
आपण पाहिल्याप्रमाणे, सध्या टेलिकॉम पायाभूत सुविधांसंबंधित कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत, नुकत्याच जाहीर झालेल्या आगामी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे टार्गेट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आहे, जे शेवटी आर्थिक वाढीस मदत करेल, बिझनेस मॉडेल एक्स्पोर्ट करेल, ज्यामुळे भारताचा जीडीपी वाढेल आणि जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसाठी अधिक नफा होईल. 2025 पर्यंत कंपनी आपला व्यवसाय वाढवू शकली तर शेअरचे टार्गेट 9.30 रुपयांपर्यंत असू शकते.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेयर प्राइस टार्गेट 2026
टेलिकॉम इंडस्ट्रीसुधारण्यासाठी आणि टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कंपनीला जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. कारण टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कंपनीला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज असते. सरकारने कोणत्याही योजनेअंतर्गत मदत केली नाही तर 5G तंत्रज्ञान भारतात आणण्यास बराच वेळ लागेल.

त्यामुळे हे 5G तंत्रज्ञान लवकरात लवकर आणण्यासाठी टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जीटीएल इन्फ्रासारखी कंपनी मदत करताना सरकारला दिसत आहे. तसेच जिओचा जीटीएल इन्फ्राशी झालेला करार पाहता या कंपनीच्या व्यवसायात जबरदस्त तेजी पाहायला मिळणार आहे. जर कंपनीचा व्यवसाय योजनेनुसार चालताना दिसत असेल तर आगामी काळात जीटीएल इन्फ्रा शेअर प्राइस टार्गेट 2026 चे पहिले टार्गेट 15.30 रुपये आहे. तर 18 रुपयांचे दुसरे टार्गेटही पूर्ण होऊ शकते.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड शेयर प्राइस टार्गेट 2030
टेलिकॉम क्षेत्राला ५ जीसाठी टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भासणार असल्याने जीटीएल इन्फ्रा आघाडीवर असणार आहे. कारण ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या टॉवर इन्स्टॉलेशन कंपन्यांपैकी एक असून कंपनीच्या व्यवस्थापनाला अनेक वर्षांचा अनुभव आहे. याचा फायदा कंपनीला आपला व्यवसाय वाढविण्यास मोठ्या प्रमाणात मदत करेल. तसेच चीनची टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भारतसोडून गेल्याने स्थानिक कंपनी जीटीएल इन्फ्रा पुन्हा एकदा मजबूत कंपनी म्हणून उदयास येण्याची पूर्ण क्षमता आहे. भविष्यातील या परिस्थितीशी जुळवून घेण्यात व्यवस्थापनाला यश आले, तर दीर्घ काळासाठी जीटीएल इन्फ्राचे शेअरचे लक्ष्य 75 रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

जीटीएल इन्फ्रा भविष्यातील नजरेतून :
भविष्याच्या दृष्टिकोनातून जीटीएल इन्फ्रा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे. आजही जीटीएल इन्फ्रा ही टॉवर इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीला अजूनही आपला व्यवसाय वाढवण्याची पूर्ण क्षमता दिसत आहे. पण सध्या तरी कंपनीचे फंडामेंटल अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळे थोडा वेळ वाट पाहावी आणि नंतर गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. आगामी काळात कंपनीचे एथिक्स आणि व्हिजन कोठे जात आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कंपनीची कामगिरी हळूहळू चांगली होत असल्याचे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जबरदस्त नफा दिसेल. मात्र सध्याची स्थिती पाहता हा शेअर गुंतवणुकीसाठी प्रचंड धोकादायक आहे. त्यामुळे कंपनीचे फंडामेंटल्स (नकारात्मक) गांभीर्याने विचारात घ्या.

नोट पॉईंट : जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची ही किंमत उद्दिष्टे केवळ संदर्भ हेतूसाठी आहेत, हा अंदाज तेव्हाच शक्य आहे जेव्हा कंपनीबद्दल सकारात्मक बाजार भावना असतील, कंपनीतील कोणतीही अनिश्चितता किंवा जागतिक बाजारपेठेची स्थिती या विश्लेषणात समाविष्ट केली जात नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GTL Infra Share Price Target Forecast.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x