Adolf Hitler & Netaji Subhas Chandra Bose | हिटलरला मागावी लागलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माफी

आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला जगाच्या इतिहासात सर्वात क्रूर शासक म्हणून ओळखले जाते, ज्याच्या महत्वाकांक्षेपुढे भलेभले राष्ट्र झूकले होते. पण हिटलर जेवढा क्रूर होता, तेवढाच तो मनाने भित्रा सुध्दा होता. याच भित्रेपणामुळे शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. लाखो यहूदी लोकांचा नाहक जीव घेणार्या या क्रूर माणसाला इतिहासात एका भारतीय व्यक्तीपुढे झुकावं लागलं होतं. पण कोण होता तो भारतीय माणूस ? असं काय झालं की ज्यामुळे हिटलर सारख्या निर्दयी माणसाला झूकावं लागलं ? हे सगळ आपण या लेखात पाहणार आहोत, म्हणून लेख शेवट पर्यंत वाचायला विसरू नका.
हिटलरला मागावी लागलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माफी – Adolf Hitler was meet to Netaji Subhash Chandra Bose :
कोण होता हिटलर: (Who was Adolf Hitler)
एडॉल्फ हिटलर हा सुरूवातीला एक सामान्य माणूस होता. त्याने सुरूवातीला पडेल ती कामे करून आपला उदरनिर्वाह चालवला. सायबेरिया आणि ऑस्ट्रीयाच्या वादाने पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि या वादाने पहिल्या महायुद्धाचे स्वरूप धारण केले. या युध्दाच्या ठिणगीने हिटलरला सैन्यात भरती होण्यास भाग पाडले. हिटलर हा सैन्यात सुध्दा एक साधा शिपाई होता, पण त्याकाळी फ्रान्सचा नेपोलियन, इटलीचा मुसोलिनी, तुर्कीचा केमालपाशा या हूकूमशहांचा दरारा राजकारणात होता. याचाच परिणाम हिटलरवर झाला. हिटलर तर इटलीच्या मुसोलिनी या हूकूमशहाला खुप मानत होता.
त्याने दाखवलेल्या तत्वांना अनूसरूनच त्यानं नाझी पक्षाची स्थापना केली, आणि आपल्या प्रचंड महत्वकांक्षी धोरणाने जर्मनीची सत्ता आपल्या हातात घेतली. त्याचं म्हणणं होतं की जर्मन लोक हे “आर्य” वंशाचे आहेत, आणि हा वंश जगातील सर्वोच्च वंश आहे. या वंशाने जगावर राज्य करावे, हे या वंशाचे कर्तव्य आहे. त्याचा यहूदी लोकांवर प्रचंड राग होता. त्याने यहूदी लोकांना दिलेली वागणूक जगजाहीर आहे. त्याचं म्हणणं होतं की, यहूदी लोक हे व्यभिचारी आणि अधर्मी आहेत, त्यांना जगण्याचा आधिकार नाही.
पण अशी प्रचंड महत्त्वकांक्षा असलेला माणूस, ज्याचा, त्याकाळातील राजकारणावर प्रचंड दबदबा होता, त्याला सुध्दा कुणाची तरी माफी मागावी लागल्याचं इतिहासात आपल्याला पहायला मिळतं आणि तो माणूस भारतीय होता हे विशेष. तो भारतीय नेता म्हणजे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस. हो ! ह्या धगधगत्या लाव्यासमोर हिटलरला झूकावं लागलं होतं.
का मागितली हिटलरने नेताजींची माफी ?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासंदर्भात हिटलरची भेट घेतली होती. “शत्रुचा शत्रु तो आपला मित्र” या उक्तीप्रमाणे हिटलरला आपल्या बाजूने करून घेण्याचा त्यांचा मानस होता, पण त्याकाळी हिटलरने आपलं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्या पुस्तकात त्याने भारत व भारतीय लोकांविषयी आपत्तीजनक लिखाण केलं होतं. ही बाब नेताजींना अजिबात आवडलेली नव्हती. हिटलरच्या भेटीच्या वेळी त्यांनी आपली नाराजी हिटलर समोर तीव्र शब्दात बोलुन दाखवली. त्यावर हिटलरने नेताजींसमोर आपण केलेल्या लिखानाबाबत माफी मागितली आणि दिलगिरीही व्यक्त केली.
When Adolf Hitler meet Major Dhyan Chand :
भारतीय खेळाडूपुढे हिटलर तोंडघशी पडतो तेव्हा:
हा काळ होता सन 1939 चा. जर्मनीमध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय खेळाडू सुध्दा सामिल झाले होते. त्यातच भारत आणि जर्मनी ह्यांच्यादरम्यान हॉकीची मॅच होती. मैदानात भारताकडून मेजर ध्यानचंद व त्यांचे सहकारी होते. अर्थातच, ध्यानचंद यांच्या तुफानी खेळाने जर्मनीचा 6-1 असा दारून पराभव झाला. ही मॅच बघण्यासाठी हिटलर तेथे उपस्थित होता.
त्याला ध्यानचंद यांची खेळी खुपच आवडली. त्याने त्यांना बोलावून आपल्या सैन्यात उच्चपदाची नोकरी देऊन आपल्यासाठी खेळण्याचा प्रस्ताव ध्यानचंद यांच्यासमोर ठेवला होता, पण कट्टर देशप्रेमी असलेल्या मेजर ध्यानचंद यांनी त्याचा हा प्रस्ताव फेटाळून लावला, आणि अशा तऱ्हेने हिटलर, मेजर ध्यानचंद याच्या समोर तोंडघशी पडला.
हिटलरचं पहिलं प्रेम – Adolf Hitler Secret Love Story Eva Braun :
हिटलरचा यहूदींवरचा राग जगजाहीर आहे आणि त्याची त्यांच्या विषयीची विचारसरणी सुध्दा जगाला माहीती आहे, पण यहूदींना अक्षरशः शिव्या घालणारा हा माणूस शेवटी प्रेमात सुध्दा एका यहूदी तरूणीच्याच पडला. जग हलवणारा हा हूकूमशहा आपलं प्रेम व्यक्त करण्यास मात्र खुप घाबरला आणि शेवटपर्यंत बोलु शकला नाही. इतक्या लोकांची हत्या करणारा माणूस, जेंव्हा आपण हरणार असं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने आत्महत्या करून स्वतःच जीवन संपवलं. हा हुकूमशहा ज्या यहूदी तरूणीच्या प्रेमात पडला होता, तिचं नाव होतं “इवा ब्राऊन”. नंतर ती “इवा हिटलर” म्हणुन जगासमोर आली. तर ही होती जगात सर्वात क्रूर समजल्या जाणाऱ्या हिटलरची “द अन टोल्ड स्टोरी”
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
Story Title: Adolf Hitler was meet to Netaji Subhash Chandra Bose.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK