जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत,
कारण हसणाऱ्या प्रत्येकाकडे हसण्यास खर कारण नसत…

जोकर बनून स्वतःच स्वतःची टिंगल मी उडवावी,
उद्देश इतकाच गालावरची खळी तिची अधिक गहिरी व्हावी..

आपल्याच छोट्या-छोट्या गोष्टींवर हास्याचे फवारे बहरत राहावे…
जीन्स-टॉपची सवय असलेल्या तिला एकदा नऊवारीत लहरताना पाहावे….

निखळ हास्याकरिता तिच्या मी अंतरीचे दुःखे झाकावीत….
भाळूनी त्या खळीवर प्रियेच्या सारी सुखे ओवाळून टाकावीत…

एक हसतमुख विदुषक म्हणून जन्मुनी तिच्या जगात हास्य पसरावे…
जोकर म्हणुनी का होईना स्मरूनी मला, तिने सारे दुःख विसरावे…

 

लेखक: पियुष खांडेकर

जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत !!