लिहावास वाटत आहे काही तरी
काही मनातल काही विचारांतल

उमटवावेस वाटत आहे काहीसे
काही मनातल काही विचारांतल

सांगावस वाटत आहे कुणाला तरी
काही मनातल काही विचारांतल

समजवावेस वाटत पुन्हा एकदा
काही मनातल काही विचारांतल

जगावस वाटत आहे पुन्हा एकदा
काही मनातल काही विचारांतल

बघतोय लावुन आयुष्याचा हीशोब
काही मनातुन काही विचारांतुन

जोडली जातात काही नाते असेच
काही मनातुन काही विचारांतुन

प्रेम की मैत्री समजव एकदा
थोड मनातुन थोड विचारांतुन

स्वप्नच तु सत्यात उतर आता
थोड मनातुन थोड विचारांतुन

जा तोडुन टाक बंध समाजाचे
काही मनातुन काही विचारांतुन

घेयची आहे उंच भरारी आता.
काही मनातुन काही विचारांतुन

जग आता निवांत नभाकडे पहात
काही मनातुन काही विचारांतुन

लेखक: पियुष खांडेकर

काही मनातल काही विचारांतल !!