महत्वाच्या बातम्या
-
मुलांवर लक्ष ठेवा | लोखंडी शिडीला वीजेच्या तारा | खेळताना स्पर्श होताच मुलगा भस्मसात
मुंबईतील ऐरोली परिसरात एका 12 वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्यानंतर जळून मृत्यू झाला आहे. हा मुलगा रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका लोखंडी शिडीला स्पर्श करत होता. तर ती शिडी रस्त्यावरच असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाली. स्पर्श होताच आगीचा भडका उडाला आणि तो मुलगा जळून जागीच मृत्यूमुखी पावला.
13 दिवसांपूर्वी -
गुजरातमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू
गुजरातमधील सुरतमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
भंडारा | शिशु केअर युनिटच्या अग्नितांडवात १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू | चौकशीचे आदेश
नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळला | चौघांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 200 फूट दरीत कोसळला असून 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर अंदाजे 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
जर्मनीत बारमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू
जर्मनीच्या दोन बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनीच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहराच्या शिशा बारमध्ये गोळीबार केला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता घडली आहे.
1 वर्षांपूर्वी -
बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; २० प्रवाशांचा जागीच मृत्यू
तमिळनाडूमधील अविनाशी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि लॉरीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू
गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
नेरुळमधील सीहोम्स इमारतीला भीषण आग, ७ जवान जखमी
काळचौकी परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागल्याची घटना ताजी असताना, नवी मुंबईतही एका टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत नेरुळच्या सीवूड सेक्टर ४४ मध्ये एका टॉवरमध्ये शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास आग भडकली होती. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
जळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.
1 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार
नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
1 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.
1 वर्षांपूर्वी -
पुणे: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू
यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
1 वर्षांपूर्वी -
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
बोरघाटात खासगी बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी
दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.
1 वर्षांपूर्वी -
पुण्यात लोखंडी होर्डिंग पडताना सि.सि.टिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
पुण्यात लोखंडी होर्डिंग पडताना सि.सि.टिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
2 वर्षांपूर्वी -
आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून बालिकेचा मृत्यू
आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून बालिकेचा मृत्यू
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Techno Alert | '१२३४५' सर्वाधिक हॅक होणारा पासवर्ड
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद
-
इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात
-
Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे
-
केंद्राच्या सोशल मीडिया मार्गदर्शन सूचना | 'त्या' नियमामुळे व्हाट्सअँप भारतात बंद होईल?
-
वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीस आमने-सामने
-
पुडुचेरी आणि महाराष्ट्रात फरक आहे | मात्र जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवा - शिवसेना
-
प. बंगालमध्ये ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही - पंतप्रधान
-
अखेर संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
-
चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका - संजय राठोड