महत्वाच्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदेंचा एक्सिट? योजना तयार, अजित पवार - फडणवीसांची राजकीय विश्वासार्हता संपुष्टात येणार?
Ajit Pawar | भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमती दिली आहे. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, अशी माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
2 महिन्यांपूर्वी -
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार, शिंदेंना बाजूला करण्याची तयारी, अजित पवार मुख्यमंत्री? राज्यात राजकीय त्सुनामी येणार
Ajit Pawar on The Way | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या युतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उत्तराधिकारी बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतराच्या निकालाची टांगती तलवार असल्याने सत्ताबदल ही केवळ काळाची बाब असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची घाई झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा असल्याने पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही असा देखील इंडियन एक्सप्रेसने धक्कादायक खुलासा केला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
... आणि अजितदादा फडणवीसांना म्हणाले, 'मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री!
Ajit Pawar | देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेचार वर्षे मुख्यमंत्री राहायचे आणि नंतरच्या सहा महिन्यात वेगळा विदर्भ करायचा असं त्यांच्या मनात होतं आता ते कितीही नाही म्हंटले तरी त्यांच्या मनात होतं असे पटवून देत असतांना अजित पवार यांनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मंत्री पदावरून शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल करत असतांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आणि सहा खात्यांची जबाबदारी आहे त्यावरून देखील टोला लगावला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
DCM Ajit Pawar | आता ही स्क्रिप्ट कोणी लिहिली? | संतांच्या देहूत सुद्धा 'राजकीय द्वेषाचं' राजकारण राज्यानं पाहिलं
आज देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री
अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
2 वर्षांपूर्वी -
IT Notice to Sugar Factories | राज्यातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा | केंद्र विरुद्ध सहकार क्षेत्र?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे पण सध्या फक्त काहीच कारखान्यांवर (IT Notice to Sugar Factories) कारवाई सुरू कायदेशीर कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात एकूण 60 साखर कारखान्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा पाठवले आहेत या कारखान्यांकडे प्राप्तिकर विभागाची सात हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IT Raided Vs Ajit Pawar | माझ्या कंपन्यांवर IT'ची धाड, पण माझ्या ३ बहिणींवर IT'च्या धाडी का? - उपमुख्यमंत्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाड पडल्याचं सकाळी वृत्त आलं होतं. यावरच स्पष्टीकरण देताना होय माझ्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीने धाडी टाकल्या (IT Raided Vs Ajit Pawar) आहेत. आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
2 वर्षांपूर्वी -
लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाहीत | लस आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर शाळांचा विचार - उपमुख्यमंत्री
देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप असल्याने अद्याप सर्व शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने आता सरकार सर्व शाळा सुरु करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे दिसून येते.
2 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि नव्या चेहेऱ्यांनाही संधी देणार | कार्यकर्ताही महत्वाचा - अजित पवार
लवकरच जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जसं मागच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही तुमच्या भागातून खासदार देखील निवडून देण्याचा काम केले आहे. तसेच जिल्ह्यातून 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 2 आमदार काँग्रेसचे निवडून दिले. आम्ही खासदार-आमदार मंत्री झालो, तरी खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील संधी मिळाली पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या निवडणुकीत नव्या चेहेऱ्यांचा आणि जुन्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kirit Somaiya Vs Ajit Pawar | ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार - अजित पवार
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळपासून ठाकरे सरकारच्या नेते-मंत्र्यांच्याविरोधात आरोपांचा धडाका लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील 19 बंगल्याची आणि अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार अ्सल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
2 वर्षांपूर्वी -
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पुणे-पिंपरीचे | चंद्रकांत पाटल यांचं टीकास्त्र
मला हे कळत नाही की उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुणे, पिंपरीचे, अख्ख्या कोरोना काळात ते कुठे नागपूरला चंद्रपूरला गेले का? का राज्यातील इतर जिल्हे कुठे आहेत, त्यांना माहीतच नाही, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यांनी पुणे, पिंपरीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अनेक नगरसेवक संपर्काच असल्याचे विधान केले होते.
2 वर्षांपूर्वी -
सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार - उपमुख्यमंत्री
मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे शनिवारी (दि. १८) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात | पुण्यातील अनेक भाजप नगरसेवक संपर्कात - अजित पवार
आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
गणेशविसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार
राज्यात कोरोनाचे सावट असून यंदादेखील होत असलेल्या गणेश उत्सवासाठी पोलिसांकडे नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व च्या सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
2 वर्षांपूर्वी -
राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा आल्यास स्पष्ट भूमिका मांडू – उपमुख्यमंत्री
केंद्र सरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्य सरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट जीएसटी कौन्सिलमध्ये आली तर तिथे मात्र स्पष्ट भूमिका मांडू असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
2 वर्षांपूर्वी -
गडकरींचं मंत्रालय निधी देतंय | सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार? | ते पूर्वीचं अवघड खातं
करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
2 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला | आता अजित पवारांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.
2 वर्षांपूर्वी -
Bhuvikas Bank | भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ | 33,895 शेतकऱ्यांना लाभ - उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे - अजित पवार
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काही दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोकणात मोठ्या प्रममाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
-
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
-
Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?
-
Hilton Metal Share Price | हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, मागील 3 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला