महत्वाच्या बातम्या
-
शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांना दुय्यम स्थान | फडणवीसांचे राजकीय पंख 3 प्रमुख नेतेच छाटणार? - सविस्तर वृत्त
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर सरकार पडणार हे निश्चित होतं. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती शिंदे आणि भाजप यांचं सरकार येणार याची. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
2 महिन्यांपूर्वी -
National Cooperative Conference 2021 | देशाच्या कृषी बजेटवरून माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लगावला टोला
भारताचे पहिले सहकार मंत्री यांनी आज पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात सहकार क्षेत्रातील विविध मुद्यांना स्पर्श करत केंद्रातल्या मागच्या सरकारला कृषी बजेटचा “आरसा” दाखवून त्यांचे वाभाडे काढले. 2009-10 मध्ये कृषी क्षेत्राचे बजेट फक्त 12 हजार कोटी रुपये होते, असे त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा सांगून माजी कृषीमंत्र्यांना त्यांच्या कथित “अतुलनीय कामगिरीची” जाणीव करून दिली.
11 महिन्यांपूर्वी -
हिंदू धर्माला धोका असल्याच्या बातम्या काल्पनिक | केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण
हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाऱ्याला प्रतिसाद देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील हिंदू धर्माला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी जबलपुरे यांनी आरटीआयद्वारे देशातील हिंदू धर्माला धोका असल्याचा पुरावा गृहमंत्रालयाकडे मागितला होता. आणि गृहमंत्रालयाकडे तो पुरावा आहे, असा त्यांनी दावा केला होता.
11 महिन्यांपूर्वी -
पवार इफेक्ट? | राज्यांमधल्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही - अमित शहा
विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नाही… पण सहकारी संस्थांनी जबाबदारीने देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे, असे लेखी उत्तर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिले आहे.
1 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम वाद पेटला | मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा, IG, DIG यांच्यावरही FIR
ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादात मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यतिरिक्त, 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आसामच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
निवडणूक रॅलीत सहभागी झालेल्या अमित शहांविरोधात FIR का नोंदवला गेला नाही? - कर्नाटक हायकोर्ट
देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना दुसऱ्याबाजूला ५ राज्यांतील विधानसभा आणि काही ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅली आणि सभांमध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे समोर आले. यावरून कर्नाटक हायकोर्टाने बेळगाव पोलिसांना धारेवर धरले असून, कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात FIR का नोंदवला नाही, अशी विचारणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
'दो मई, दीदी गई' म्हणणारे नेते निकालानंतर 'किधर गई'? | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार
काँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय निवडणूक मॅनेजर वाटतात | ते मग्रुरी आणि पोकळ बाता मारणारे नेते - प्रशांत किशोर
रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजप दोनशेहून अधिक जागा जिंकेल या अमित शहांच्या स्वप्न दाखवणाऱ्या कथा देखील खोट्या ठरल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीनचं प्रकरण | अमित शहांची प्रतिक्रिया
काल निवडणूक आयोगाची गाडी बंद पडल्याने भाजप उमेदवाराच्या गाडीतून इव्हीएम मशीन नेल्याचा प्रकार आसाममध्ये घडला होता. यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आहे. यानंतर वाद निर्माण झाला असून रातबारी मतदारसंघातील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी चार अधिकारी निलंबितदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.
1 वर्षांपूर्वी -
मानहानी प्रकरणात अमित शहांना कोर्टाचं समन्स येताच अभिषेक बॅनर्जीच्या घरी CBI?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वाद शिगेला पोहचल्याचं दिसत असताना, आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) रडारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आल्याचे दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
...तुमचा मुलगा जय शाहचं काय? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? | ममता बॅनर्जींचा सवाल
मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती | अमित शहांचा संताप
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंना कसं साभाळावं आणि सन्मान करावा, ते भाजपला माहिती - अमित शहा
नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले
2 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्री दीप सिद्धूला किती वेळा आणि कोणत्या तारखेला भेटले होते | RTI अंतर्गत प्रश्न
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
हिंसक शेतकरी आंदोलन | अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | मणी लॉन्ड्रींग प्रकरणातील १३ पैकी ७ जण भाजपात | घोटाळ्याचे व्हिडिओ गायब
पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन अधिकच उग्र होतंय | गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक
नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (New Agriculture Laws) शेतकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात (Delhi Border Farmers Protest) प्रत्येक राजकीय पक्ष आपला झेंडा सर्वात उंच ठेवू इच्छित आहेत. यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही, तर अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. केंद्र सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे मागे घेण्यास केंद्राचा नकार | शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांची चिकाटी | अखेर अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक
‘भारत बंद’ बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (All India Bharat Bandh called by protestant farmers) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Minister Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असताना देखील अमित शहा यांनी ही तातडीची बैठक अचानक बोलावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकाटीपुढे सरकार झुकवणार की शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण होणार ते पाहावं लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
अमित शहा प. बंगालमध्ये आले | पण बिरसा मुंडांऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घातला
मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह गुरुवारी बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी बहुल बांकुरा येथे भेट दिली आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. त्यादरम्यान त्यांनी बिरसा मुंडा यांच्याऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अमित शकांनी केलेल्या या चुकीने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने शहांवर तिखट शद्बात टीकास्त्र सोडलं आहे. शहांविरोधात संताप व्यक्त करताना त्यांचा उल्लेख थेट ‘बाहेरचे’ असा केला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
-
Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Outstanding Tax Demand | रिटर्न प्रोसेसिंगनंतर येतेय 'आऊटस्टँडिंग टॅक्स डिमांड?, घाबरून जाण्याऐवजी या स्टेप्स फॉलो करा
-
Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल
-
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Investment Tips | तुमच्या गुंतवणुकीत उत्तम असेट्स मॅनेजरची निवड कशी करावी?, फायद्याची माहिती जाणून घ्या
-
Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा
-
WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही