महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? - आ. आशिष शेलार
महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनाही प्रशासकीय डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची कोंडी करताना दिसत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
‘गोली मार भेजे में’ शिवसैनिक कार्यकर्ते रस्त्यावर | हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे - आ. आशिष शेलार
पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांवर भाजपने निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ ट्विट करून थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कारवाईबाबत प्रश्न विचारले. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
स्वतःच्या अहंकारासाठी 'उखाड दिया'ची भाषा | आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.
3 महिन्यांपूर्वी -
युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला | यावेळी वेगळं चित्र दिसेल - आशिष शेलार
ठाण्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, परंतु, आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊ न देण्याचा डाव आखला जातोय
कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
4 महिन्यांपूर्वी -
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला | कोणी कामगारांना फसवलं
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
भाषणात नवीन काहीच नव्हतं | केवळ जळफळाट | भाजपची दहशत पाहायला मिळाली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत भाजपवर देखील तिखट शब्दात निशाणा साधला होता.
6 महिन्यांपूर्वी -
मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडले आणि बांधावर गेल्याने...काय म्हणाले आशिष शेलार?
राज्यात आजी आणि माजी मुख्यमंत्री परतीचा पाऊस आणि पुरामुळे काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करत आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी “देर आए, दुरुस्त आए”, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
भाजपा आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन | मुंब्रा येथून दोघे अटकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना ताजा असतानाच आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
नेहमीचाच पावसाळा | मुंबईकरांनो शांतता राखा | बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे - आ. आशिष शेलार
काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
CAA चं लोकसभेत समर्थन राज्यसभेत यू-टर्न | कृषी विधेयकाला लोकसभेत पाठिंबा राज्यसभेत सभात्याग
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषिविषयक तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत पारित करून घेतली आहे. काल संध्याकाळी राज्यसभेत प्रचंड गोंधळामध्येही ही विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने पारीत करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोध केला होता. दरम्यान, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे काढत नाहीत | बॉलिवूडशी संबंध असणारे वांद्रे पूर्वेला राहतात
“बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी पत्रक जाहीर करुन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही भाजपा नेते मात्र त्यांच्यावर आरोप करणं सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामं | उद्यापासून रोज मुंबई महापालिकेला यादी पाठवणार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे.
7 महिन्यांपूर्वी -
कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही - आ. आशिष शेलार
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
महापौरांच्या मुलाला व जावयाला कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्ट | भाजप अधिवेशनात पर्दाफाश करणार
अभिनेता दिनो मोर्या यांचे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे संबंध जगजाहीर आहेत. मोर्याशी संबंधित लोकांनाच आरोग्यविषयक कामांचे ठेके दिले जात आहेत. दुसरीकडे मुंबईच्या महापौर स्वत:च्या मुलाला आणि जावयाला कोव्हीड सेंटर देण्यात व्यस्त आहेत, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश अधिवेशनात भाजपच्या वतीने केला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते माजी शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
खड्डयांसोबत सेल्फी | राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर स्तुत्य उपक्रम का राबत नाही?
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असे प्रश्न भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी विचारले आहेत. शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना यासंदर्भात एक पत्रदेखील लिहिलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास - आ आशिष शेलार
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये पार्ट्यांच्या आयोजनात पब-पार्टी गँगचे कुणी समर्थक सत्ताधारी आहेत का?
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.
8 महिन्यांपूर्वी -
वटवृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार आणि मुंबईत १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर
भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
9 महिन्यांपूर्वी -
केंद्र सरकार कोकणात विशेष रेल्वे सोडायला तयार, ठाकरे सरकारकडून मागणीच नाही - आ. आशिष शेलार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय ठाकरे सरकारने घेतला नसून, आता यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एवढेच नाही तर चाकरमान्यांची कोंडी करण्याची ठाकरे सरकारची इच्छा असल्याचा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा
-
Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा