महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | शिंदे गटातील 16 आमदार निलंबित होण्याची भाजपाला धास्ती असल्याने?, अशोक चव्हाण आणि ऑपरेशन लोटसच संपूर्ण विश्लेषण
Ashok Chavan | मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. मंत्र्यांना करण्यात आलेल्या खातेवाटपावरून तर शिंदे गटात नाराजी असून, भाजपच्या मंत्र्यांना सर्वाधिक वजनदार आणि मलाईदार खाती मिळाल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं होतं, तर चंद्रकांत पाटलांनीही मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि फडणवीस सरकारमध्ये सगळेच आलबेल सुरू आहे, असं म्हटल्यास धाडसाचं ठरेल.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा | अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-औरंगाबाद-जालना-नांदेड-हैदराबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून, या पत्रात त्यांनी सदरहू मार्गाची आवश्यकता आणि या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमधील भेट राजकीय नव्हती | फडणवीसांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं - अशोक चव्हाण
पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला आणि काही संघटनांना दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपच्या पॅनलचा धुव्वा
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकत महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर महाविकासआघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे पालकमंत्री अशेक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १३, राष्ट्रवादी काँग्रेसने ३ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | फडणवीसांचं विधान म्हणजे खोटे बोला पण रेटून बोला असा प्रकार - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वाद सुरू झाल्याचे आज पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिलेला आहे. आता यावर अशोक चव्हाणांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण हे कोणाच्याही मालकीचे नाही आणि खोटे बोल पण रेटून बोला असे फडणवीसांचे आहे असे म्हणत अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेनं सल्ला देऊ नये - अशोक चव्हाण
संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकारण रंगले आहे. यूपीएचे नेतृत्व कोण करणार? यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी ईच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या कृषी कायद्यांत ठाकरे सरकार बदल करणार? | मंत्र्यांमध्ये पत्रव्यवहार सुरु
केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मत नोंदवत महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी संबंधित कायद्यांबाबत जी कठोर भूमिका घेतली आहे, त्याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सुप्रीम कोर्टात टिकला का नाही? - अशोक चव्हाण
“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षातले नेते बेजबाबदार वक्तव्यं करत आहेत. या मुद्द्यावर त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही म्हणून उचलली जीभ की लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.” अशी टीका काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. मराठा आंदोलकाना घरात घुसून मारलं जातं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या टीकेला आता अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपचा मोठा नेता फोडून स्पर्धक संपवले
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाची राज्यातील दशा आणि दिशा दिसू लागली आहे. आमदार फुटले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीसमोर पुन्हा निवडून येणे जवळपास अशक्य असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील आमदारांना देखील मिळले असतील. मात्र भारतीय जनता नेते मंडळींना देखील त्या मिळाले असावेत. परिणामी भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस आता बारगळलं असलं तरी दुसऱ्या बाजूला ‘लोटसचच ऑपरेशन’ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का? | हा चौकशीचा भाग आहे - अशोक चव्हाण
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV editor Arnab Goswami) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला (Mumbai High Court rejected Interim bail to Arnab Goswami). त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही | अशोक चव्हाण
महाविकास आघाडी सरकारमध्ये काही बाबतीत आलबेल नसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपने राज्यात काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते | म्हणून काँग्रेसने...
काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
घटनापीठापुढेच आम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे - अशोक चव्हाण
सर्वोच्च न्यायालयात उद्या मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपिवले होते. मात्र उद्याची सुनावणी न्या. नागेश्वर राव यांच्याच खंडपीठापुढे होणार असल्याने उद्या काय होणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून होती.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रातही एकत्र असायला हवं | सभात्यागाचं सेना-राष्ट्रवादीला विचारा - अशोक चव्हाण
केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं. या विधेयकाला शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला, तर राज्यसभेतून त्यांनी वॉकआऊट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाविरोधात लोकसभेत भाषण केलं, पण राज्यसभेत मतदानाच्यावेळी राष्ट्रवादीनेही शिवसेनेप्रमाणेच वॉकआऊट केलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यसभेतून वॉकआऊट केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित केले गेले.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | अमिताभ बच्चन यांची दाऊद सोबत मैत्री | अशोक चव्हाण यांचा फोटो वापरून खोटी माहिती
बॉलीवूड अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | निकाल धक्कादायक | निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार
मराठा आरक्षणाबाबत निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. हा अंतरिम आदेश आहे. हा विषय अंतिम निर्णयासाठी घटनापीठाकडे गेला आहे. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. अंतरिम आदेश दिलाय त्यात यापूर्वीच्या आरक्षणाला धक्का नाही. यंदाच्या नोकर्या आणि शैक्षणिक प्रवेशात आरक्षण नसेल. हा अधिकार घटनापीठाकडे आहे, असे चव्हाण म्हणालेत.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं - अशोक चव्हाण
नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसपक्षांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. २३ काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत आपली भूमिका माडंली असून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं असं मत त्यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ | मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मराठा आरक्षण मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. दरम्यान अशोक चव्हाण नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण याच पार्श्वभुमीवर त्यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आलीय. मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC