महत्वाच्या बातम्या
-
Bharat Jodo Yatra | 3000 किमी चालत दिल्लीला पोहोचली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, प्रचंड थंडीतही लोकांची प्रचंड गर्दी
Bharat Jodo Yatra | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील नऊ राज्यातून पार करत आज राजधानी दिल्लीत पोहोचली. विशेष म्हणजे या काळात राहुल गांधी ३००० किलोमीटरहून अधिक अंतर चालत दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रचारात राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. “ते द्वेष पसरवतात, आमच्यात प्रेम आहे, आम्ही सर्व भारतीयांना जवळ घेतो आणि त्यांना मायेने आलिंगन देतो,” असं राहुल गांधी दिल्लीत पोहोचल्यानंतर म्हणाले. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला जाणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Bharat Jodo Yatra | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गुजरातला न जाता निवडणुकीचा मुद्दा बनली, जोरदार शाब्दिक युद्ध
Bharat Jodo Yatra | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसेलही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आक्रमणामुळे अचानक काँग्रेसच्या या पदयात्रेला राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारयुद्धात मोठा मुद्दा वाटू लागला आहे. सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या निवडणूक सभांमध्ये पदयात्रेला लक्ष्य केले, त्यानंतर काँग्रेसला त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेबाबत केलेल्या वक्तव्यांना त्यांच्या ‘निराशेचा’ परिणाम म्हणून संबोधत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी पदयात्रेवर केलेल्या राजकीय हल्ल्यांना खुद्द राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक सभांमध्ये कोणतेही थेट उत्तर दिले नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Bharat Jodo Yatra | भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात राहुल गांधीना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वच राज्यांमध्ये प्रचंड पाठिंबा, उद्या तेलंगणा प्रवेश
Bharat Jodo Yatra | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतात प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शनिवारी कर्नाटकातील रायचूर येथील येरागेरा गावातून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. आंध्र प्रदेशातून शुक्रवारी सायंकाळी पुन्हा कर्नाटकात दाखल झाले. २३ ऑक्टोबरला ही यात्रा तेलंगणमध्ये प्रवेश करणार आहे. सर्वच राज्यांमध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी तरुण, तरुणी, वृद्ध ते लहान मुलांची तुफान गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोदी मीडियाला सुद्धा दाखल घेणं भाग पडलं आहे तर भाजपचा आयटी सेल सुद्धा हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक विषय भाजपवर उलटत असल्याने भाजपमध्ये चिंता वाढली आहे. देशात बेरोजगारी आणि महागाईचा गडद होऊ लागल्याने भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक विषयांना बळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
भारत जोडो यात्रेला कर्नाटकात तुफान प्रतिसाद, सर्वेक्षणात सत्तांतराचे संकेत, ईडी ऍक्शन मोडवर, डिके शिवकुमार यांना समन्स बजावलं
Bharat Jodo Yatra | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना समन्स बजावून ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीचे सहाय्यक संचालक कुलदीप सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “तुम्हाला (डी. के. शिवकुमार) पुन्हा एकदा कार्यालयात 23 सप्टेंबर रोजी समन्सनुसार 7 ऑक्टोबर रोजी आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) च्या कलम ५० अन्वये हे समन्स बजावण्यात आले आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये