महत्वाच्या बातम्या
-
आंध्रा: ‘चलो आत्मकूर’ आंदोलनामुळे चंद्राबाबू नजरकैदेत; तर TDP कार्यकर्त्यांची धरपकड
‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. नायडू यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत गुंटूर जिल्ह्यात सरकारच्या विरोधात चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वायएस जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळात ५ जातीचे ५ उपमुख्यमंत्री
आंध्र प्रदेश सरकारमध्ये केवळ १-२ नव्हे, तर तब्बल ५ उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संविधानिक अधिकार नसतो, मात्र स्वतःच्या पक्षातील इतर वजनदार नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे पद निर्माण गेलं असलं तरी त्याचा वेगळाच प्रयोग सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात केला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर निसर्गाची वक्रदृष्टी
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला ऐतिहासिक आणि स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा सुपडा साफ झाला. दरम्यान पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी आज मुख्यमंत्रपदाची शपथ घेणार होते. कार्यक्रम स्थळावर जोरदार तयारीही करण्यात आली होती. परंतु, बुधवारी रात्री आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामध्ये कार्यक्रम स्थळच उद्ध्वस्त झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी पक्षांची जुळवाजुळव चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू व राहुल गांधी भेट
लोकसभेच्या एकूण २७२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार नाहीत आणि त्यामुळे भाजपाला इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष निकालाआधी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. टीडीपीचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर, त्यानंतर ते लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याच्या दिशेने रवाना झाले.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मशीन बाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये ५० टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVM मध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होत असून ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार का यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी, या देशभरातील विरोधकांच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काँग्रेस, टीडीपीसह देशातील तब्बल २१ प्रमुख विरोधी पक्षांनी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटमधल्या ५० टक्के पावत्या ईव्हीएमसोबत पडताळून पाहिल्या जाव्यात असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगला द्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे.
6 वर्षांपूर्वी -
केसीआर आणि जगनमोहन रेड्डी हे मोदींचे पाळीव कुत्रे : चंद्राबाबू
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी प्रचाराची धार विखारी होताना दिसत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला: नरेंद्र मोदी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींनी देशभर सभांचा सपाटा लावला आहे. त्यानिमित्त आंध्र प्रदेशमध्ये मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, मोदींनी यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिम्मत असेल तर मोदींनी आर्थिक मुद्यांवर माझ्याशी चर्चा करावी: चंद्राबाबूंचं आव्हान
मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी'ची काँग्रेससोबत युती, भाजपची आंध्र-तेलंगणा वाट बिकट
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि टीडीपी’ने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले असता दोन्ही नेत्यांनी चर्चेअंती हा निर्णय प्रसार माध्यमांसमोर घोषित केला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची लढाई भाजपासाठी अधिकच कठीण होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?
7 वर्षांपूर्वी -
वाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार
आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेस संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेसचे विरोधक म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) सुद्धा पाठिंबा देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता चंद्राबाबूंचा भाजपला स्वबळाचा इशारा
एनडीए मधील आणखी एक घटक पक्ष टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON