महत्वाच्या बातम्या
-
सामान्य शिवसैनिकांमध्ये आणि मराठी मतदारांमध्ये शिंदे गटाविरोधात लाव्हा धगधगतोय, बिथरलेला शिंदे गट सर्व्हे करून घेणार
CM Eknath Shinde | शिवसेनेविरोधात बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता त्यांच्या या निर्णयाने शिवसैनिक आणि सामान्य जनता विशेष करून मराठी मतदार खूश आहेत की नाराज, याची चिंता सतावत आहे. जमिनीवरील वास्तव वेगळं असून एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजप नेते महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजकारणातून हद्दपार करू इच्छित असल्याची भावना सामान्य मराठी मतदारांमध्ये निर्माण झाल्याचं जमिनीवरील झिरो ग्राउंड रिपोर्ट सांगतो.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे सर्व समर्थक आमदारांना निवडून आणणार? | प्रथम शिंदेच्या मतदारसंघातील आकडेवारी पहा, एकनाथ शिंदेंचा पराभव होण्याचे संकेत
CM Ekanth Shinde | आमच्या लोकांना चिन्ह काय मिळणार वैगैरे चिंता सतावत होती. मी त्यांना म्हणालो आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही असं सांगितलं. भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार. हा या सभागृहातला शब्द आहे,” असं शिंदे ४ जुलै रोजी सभागृहामध्ये दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाले होते. एकजरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या शिंदेंच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर तेच पराभवाच्या छायेत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.
3 वर्षांपूर्वी -
50 Khoke Ekdam Ok | शिंदे समर्थक मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची '50 खोके एकदम ओके' घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवले
Minister Dada Bhuse | कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंना बंडखोरी नियोजन फेल होण्याची भीती, अनेक आमदार आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
CM Eknath Shinde | शिवसेनेविरोधात बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिनेच झाले, पण त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या नाराजीला सध्या त्यांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच भाजपमुळे त्यांना मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करता येत नाही.
3 वर्षांपूर्वी -
एनआयएच्या अटकेतील वाझे आणि प्रदीप शर्मा जुने मित्र | प्रदीप शर्माच्या सेनेतील प्रवेशात शिंदेंचा पुढाकार, शिंदे समर्थकांचे अज्ञान?
आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकीकडे शेतकरी, मराठा तरुणांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे समर्थकांनी भाईगिरी
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना | फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका | तर उद्धव ठाकरेंना दिलासा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयावरून शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला आहे, तर उद्धव ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
निधी वाटपावरून शिंदे गट तोंडघशी पडला, मुख्यमंत्री पदाला अर्थ नसल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी दाखवून दिलं | भाजपाला मजबूत निधी
राष्ट्रवादीकडून निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीने स्वत:ला अधिक निधी घेतला. त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक निधी दिला. पण शिवसेनेला कमी निधी दिला. आम्ही मतदारसंघात कामं कशी करायची? असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तेत शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद आलं. पण त्या बदल्यात भाजपने महत्त्वाची खाती घेतली.
3 वर्षांपूर्वी -
अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
राऊतांना उत्तर देण्यासाठी महिला आमदारांचा भावनिक वापर, तर समर्थक अपक्षांचा राजकीय आकडेवारीसाठी शिंदेंकडून वापर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुवाहाटीतून शिंदेंची राष्ट्रवादीच्या नावाने बोंबाबोंब, पण मंत्रिमंडळ विस्तारात मूळ शिवसैनिकांना डावलून काँग्रेस-राष्ट्र्वादीतील आयतांना संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबण्याची दाट शक्यता आहे. खरंतर सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर 4 ऑगस्टला सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे या आठवड्यात सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर ही सुनावणी पुढच्या आठवड्यावर ढकलण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या टिपण्यांनी धाकधूक वाढवली | फडणवीस दिल्लीला रवाना, तर शिंदेंना थकवा जाणवू लागल्याने आरामाचा सल्ला
आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीशांनी केलेल्या विविध टिपण्या शिंदे गटात हादरा देऊन गेल्याच वृत्त आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने बाजू मांडणारे हरीश साळवे यांनी ‘जरी विधानसभा सदस्य गेलं तरी’ असा वाक्य प्रयोग बाजू मांडताना केल्याने भलतीच शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात अचानक इतर वृत्त समोर आली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या चिन्हाबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे मुख्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोकादायक | या टिपणीने शिंदें गटात धाकधूक वाढली
शिंदे गट विरुद्ध शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने शिंदे गट, शिवसेना आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगात असलेल्या प्रकरणात शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या 2017 सालाच्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनसेची उद्धव ठाकरेंवर नेहमीच राजकीय आगपाखड | पण आज ते पूर्वीपासून शिंदेच मनसे फोडत होते, मनसे कार्यकर्त्यांचं विलीनीकरण सुरु
एकिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षविस्तारात लक्ष घालून आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत असताना आता एकनाथ शिंदे यांनी ठाणे, उल्हसनगर, नवी मुंबई पासून कल्याण-डोंबिवली पट्ट्यात मनसे संपविण्यासाठी पावलं टाकली आहेत. मनसेचे नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं बळ वाढलेलं दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
सकाळच्या भोंग्यावरील शिंदेंच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्सकडून तुफान टीका | तुम्ही गुजराती सोमय्याचा भोंगा घेऊन फिरा अशा तिखट प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ) अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला. राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ईडीच्या हातात आहे. त्यामुळे चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला? असं राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील अनेकांच्या प्रॉपर्टी ईडीकडून सील, आता उद्धव ठाकरेंना सांगतात, तुमचे जन्मदाते वडील तुमची प्रॉपर्टी नाही
मी मुख्यमंत्री असताना माझ्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्या. एकदा नाही दोनदा झाली. एका सकाळी मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. त्यावेळी माझी जी काही अवस्था झाली तो वेगळाच अनुभव होता. मी आजारपणातून उठूच नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते तेच आज पक्ष बुडवायला निघाले आहेत अशी टीका करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA