महत्वाच्या बातम्या
-
एकनाथ शिंदे फक्त नामधारी मुख्यमंत्री? | भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांची हजेरी, विरोधकांची टीका
दिल्लीत भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री परिषद शनिवारी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र सध्या चर्चा होतेय ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. मुख्यमंत्र्यांची परिषद असताना देवेंद्र फडणवीस तिथे कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपची ही मुख्यमंत्री परिषद जवळपास ५ तास चालली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या १२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
2 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या महानगरपालिकेत शिंदे गटातील नगरसेवकांचं भवितव्य अंधारात | नाशिकचे शिवसेना नगरसेवक सतर्क
आदित्य ठाकरे अनेक जिल्ह्यांमध्ये जात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तर आता आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर नाशिकचे नगरसेवक मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण सोबत असल्याचं सांगणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
मुखयमंत्री शिंदेंचा सर्वाधिक वेळ स्वतःच्या राजकीय गट विस्तारात | गेल्या 24 दिवसांत राज्यात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन बदलले पाहिजे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा संकल्प करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या 24 दिवसांमधील चित्र हे वेगळे असून राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांना सामान्य जनतेचं समर्थन असं सांगत, लोकांची भूमिका सुद्धा शिंदेंनी स्वतःच जाहीर केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती दिली. “सर्व 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ लोकांचं पत्र दिलेलं आहे. दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. तर दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी दिल्लीत आलो होतो. मी सर्व बारा खासदारांचं मनापासून स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
2 वर्षांपूर्वी -
शिंदेंची प्रतिशिवसेना | स्वतः झाले मुख्य नेते आणि मूळ शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
10th Schedule | बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार | आमदारकी, सत्ता आणि पक्ष सर्वच हातून जाणार? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत घटनेचे 10 वे शेड्यूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी व्यक्त केले आहे. या दहाव्या शेड्युलच्या दुसऱ्या परिच्छेदानुसार जोपर्यंत पक्षातून फुटून बाहेर पडलेले आमदार यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नसेल, तोपर्यंत ते निवडून आलेल्या पक्षाचेच सदस्य राहतात. एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणात या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप त्यांना बंधनकारक ठरतो. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
हम करे सो कायदा? | राज्यात चाललंय काय? | घटनेतील कलम 164 (1A) दुर्लक्षित करत शिंदे-फडणवीसांची कॅबिनेट बैठक?
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
सरपंच जनतेतून आणि स्वतः बंडखोर आमदारांच्या समर्थनातून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेचा सर्व वेळ गट विस्तारात, जनता अधांतरी
महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेला सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यापूर्वी जनतेनं निवडून दिलेले सदस्य सरपंच किंवा नगराध्यक्षांची निवड करत होते. पण, आता निर्णय बदलला जाणार आहे. हास्यास्पद म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे मात्र जनतेतून नव्हे तर चक्क बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. आजच्या घडीला लोकांना मुख्यमंत्री निवडून देण्याची संधी दिल्यास एकनाथ शिंदे शर्यतीत सुद्धा दिसणार नाहीत असं वास्तविक चित्रं आहे.
2 वर्षांपूर्वी -
CM Eknath Shinde | शिंदेंच्या गावात शालेय विद्यार्थ्यांना प्रवासाला धड रस्ता नाही, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड - हायकोर्टाकडून दखल
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या सातारा येथील शालेय मुलींना ये-जा करताना येणाऱ्या अडचणींची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. कोर्टाने गुरुवारी सुओ मोटू याचिकेवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांच्या गावावर भाष्य करताना शाळा नाही, रस्ता नाही पण दोन हेलिपॅड आहेत, असे सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतील आमदार, खासदार, नगरसेवक शक्य तितक्या लवकर भाजपात 'गट' म्हणून विलीन करणं हेच शिंदेंना लक्ष दिलंय?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारची आज खरी परीक्षा असणार आहे. कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झालेले असताना राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असून, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झटका दिलाय.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल