महत्वाच्या बातम्या
-
खळबळ! दाऊदशी संबंधित व्यक्ती म्हणून आरोप असलेले डॉ. लांबे यांची नियुक्ती फडणवीसांनीच सप्टेंबर २०१९ मध्ये केलेली
देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर करून डॉ. लांबे यांची पोलखोल केली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.
2 महिन्यांपूर्वी -
लोकांच्या समस्या महागाई, बेरोजगारीत | आणि भाजप नेते म्हणतात फडणवीसांच्या चौकशीमुळे जनतेचा उद्रेक होईल
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, फडणवीसांना देण्यात आलेली नोटीस आणि चौकशीचा भाजपकडून निषेध केला जात आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप आमदारांसह कार्यकर्तेही जमा झाले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Phone Tapping Case | रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असल्याची माहिती दिली. पोलीस बदल्यांच्या महाघोटाळ्यातील संवेदनशील माहिती बाहेर कशी आली, याबद्दल चौकशी करण्यासाठी बोलावलं (Phone Tapping Case) आहे. मी राज्य सरकारचं षडयंत्र उघडं पाडल्यानं हे केलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
भाजपला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोट कनेक्शन | फडणवीस मूग गिळून गप्प | संपूर्ण पोलखोल
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज मुंबईत मोर्चा काढणार आहे. आझाद मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झालीय. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असून राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे, मात्र आता एक प्रकरण उलटं भाजप आणि फडणवीसांवर शेकू शकते. कारण प्रकरण थेट भाजप, दाऊद आणि टेरर फंडिंग संबंधित आहे.
3 महिन्यांपूर्वी -
दाऊदच्या नावाने बोंबाबोंब करून मुंबईकरांना महागाई, बेरोजगारीवरून विचलित करायचं | निवडणुकीत हिंदू-मुस्लिम फूट पाडायची
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा त्वरित घ्यावा, या मागणीसाठी मुंबई आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी भायखळा इथून आझाद मैदानाकडे निघणार होता.
3 महिन्यांपूर्वी -
त्या व्हिडिओत प्रथम दर्शनी मोठी छेडछाड केली गेल्याची शक्यता | व्यक्ती हावभाव आणि ऑडिओत विरोधाभास
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडीओ क्लिप्स सुपूर्द करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय.
3 महिन्यांपूर्वी -
ED अधिकारी मुंबई पोलिसांच्या चौकशी फेऱ्यात अडकण्याच्या धास्तीने फडणवीसांची CBI मार्गे नवी राजकीय खेळी?
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं होतं. ईडीचा तो अधिकारी कोण अशी चर्चाही त्यांच्या फेब्रुवारीमधील पत्रकार परिषदेपासून सुरू होती. अखेर आज संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर आरोप केले. खंडणी वसुली करुन परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे. ईडीच्या खंडणी रॅकेटच्या एजंटमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही असल्याचा दावा राऊत यांनी केला.
3 महिन्यांपूर्वी -
दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात भाजपचे मंत्री | पण आता फडणवीसांच्या दाऊद-दाऊद, बॉम्बस्फोट-बॉम्बस्फोट कांगाव्यामागील कारणं
महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. अशावेळी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय.
3 महिन्यांपूर्वी -
नागपूरचा कुख्यात गुंड मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम महामंडळाचे अध्यक्षपद देत संरक्षण दिले - नवाब मलिक
नवाब मलिक बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारी विश्वातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा (Devendra Fadnavis Munna Yadav connections) आरोप केला.
7 महिन्यांपूर्वी -
लवंगी फोडताना 'मुंबई बॉम्ब स्फोट'चा चतुरपणे उल्लेख करणाऱ्या फडणवीसांवर उद्या हायड्रोजन बॉम्ब पडणार
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी - देवेंद्र फडणवीस
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी आणि मुंबई बॉम्बस्फोट कनेक्शन फडणवीसांना ठाऊक आहे? - द-वायर वृत्त
आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. तसेच काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणतायत.
7 महिन्यांपूर्वी -
Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट
देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.
7 महिन्यांपूर्वी -
FDI in West Bengal | उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देताना फडणवीसांकडून बंगाल उद्योग क्षेत्रासंबंधित खोटी माहिती
शिवसेनेचा दसरा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. या सगळ्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली (FDI in West Bengal) आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Fadnavis On MahaVikas Aghadi | ज्यादिवशी महाविकास आघाडी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही - फडणवीस
काल शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार राजकीय प्रहार केले. विशेष म्हणजे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने (Fadnavis On MahaVikas Aghadi) पाडून दाखवावंच असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
I Am Still Chief Minister | मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे - फडणवीस
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वाट करून दिली आहे. फडणवीस म्हणाले की, ‘मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं (I Am Still Chief Minister) आहे, असं फडणवीस म्हणाले.
8 महिन्यांपूर्वी -
Maharashtra Bandh | आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे - फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद (Maharashtra Bandh) आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
ZP Panchayat Election Results 2021 | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फडणवीसांच्या नागपुरात भाजपची दुर्दशा
राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा (ZP Panchayat Election Results 2021) मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | राजकीय भूकंप | देशात चाललंय काय? | भाजपचे कार्यकर्ते NCB हाताळत आहेत?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
8 महिन्यांपूर्वी -
Heavy Rain Marathwada Flood | अतिवृष्टीने शेतकरी संकटात | शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडू - फडणवीस
हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची (Heavy Rain Marathwada Flood) पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर आज हिंगोली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला कनेरगावनाका त्यानंतर आडगाव येथे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी