महत्वाच्या बातम्या
-
पालघर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बुलेट-ट्रेनच्या विरोधात ?
सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात नोकर भरती, पण सरकारची 'अट' लागू ?
राज्य सरकारच्या सरकारी नोकर भरतीचा आकडा बघून तरुण भारावले खरे, पण त्यासाठी फडणवीस सरकारची ‘अट’ समजल्यास तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण तुमची निवड झाली तरी तुम्हाला तब्बल ५ वर्ष शिक्षण सेवकाच्या धर्तीवर केवळ मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर सुद्धा कायम स्वरूपाची खात्री नसेल, कारण त्यानंतर सुद्धा तुमची पात्रता व कामगिरी बघूनच ती नोकरी नियमित केली जाईल.
7 वर्षांपूर्वी -
सहकार मंत्र्यांच्या कंपनीवर सेबीची कारवाई
भाजपचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड या कंपनीवर ‘सेबी’ने टाच आणली आहे. सहकार मंत्री आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांच्यासह इतर तब्बल १० संचालकांवर ‘सेबी’ने भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन
सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राम शिंदे यांचा धनगर समाजाच्या आरक्षाबाबत खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. ती आज पर्यंत पूर्ण झाली नसली तरी २०१९च्या निवडणुकीपूर्वी ती मागणी पूर्ण होईल अशी पुन्हां राम शिंदे यांनी ग्वाही दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
असा कोणता गंभीर गुन्हा केलेला त्या पोलिसाने की निलंबित केलं ?
मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना त्यांचे वर्तन हे खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे असा कोणता गंभीर गुन्हा त्यांनी केला होता की त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल असा निर्णय घेण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
समुद्रच नसलेल्या १५ देशात ३२ रिफायनरीज.
कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना आणि ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असं राज्याचे प्रमुख सांगू लागले. परंतु रिफायनरी बाबतचे जगातील वास्तव समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिक्षण विभागाची 'डिजिटल'माघार, बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाइनच
शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने, बारावीचे प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची ‘डिजिटल’ म्हणजे ऑनलाइन प्रवेश घेण्याची तयारी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चहाच्या टपरीवरच मोदींच्या पराभवाची चर्चा होईल: राजू शेट्टी
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? अशी चर्चा चहाच्याच टपरीवरच करताना दिसतील.
7 वर्षांपूर्वी -
आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?
मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजपचे ४ आमदार डेंजर-झोन मध्ये - संजय काकडे
पुणे भाजपमध्ये आता पासूनच कलगीतुरा रंगायला लागला आहे. त्यात शुक्रवारी भाजपचे पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ जनक वक्त्यव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?
येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड, एकनाथ खडसेंना 'क्लीन-चिट'
भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. तसा अहवालच एसीबीने न्यायालयात सादर केल्याचं समजतं.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प विदर्भात ? आधी समुद्र विदर्भात आणा : मुख्यमंत्री
नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जाण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. आधी समुद्र विदर्भात आणा आणि नंतर नाणार असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
तेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली ? सविस्तर
राज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं पितळ उघड, नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही
आजच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये सभा झाली. सभेतच नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात अर्थ 'काट-कसर' असताना मेटेंसाठी २० लाखांची 'कार-कसर'
महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना विनायक मेटे यांच्यासाठी शासकीय खर्चातून २० लाखांची कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय जारी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
वर्षभर तरी नरेंद्र-देवेंद्र सरकारला धोका नाही, भेंडवळ घटमांडणीचं भाकित
मित्र पक्षांसोबत अंतर जरी वाढत असेल तरी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वर्षभर तरी स्थिर राहील असं भाकीत सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN