महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा 25% शुल्क कपातीचा निर्णय
महाराष्ट्राच्या इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशने असा निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 25% कपात केली जाईल. यामुळे राज्यभरातल्या सुमारे 18,000 इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Breaking | कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार | राज्य सरकारचा निर्णय
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र HSC निकाल | फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
2 वर्षांपूर्वी -
चिंताजनक | ऑनलाईन शिक्षणातून पैसा | बालभारतीच्या अॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार
कोरोना काळात शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या भरोसे पालक मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवत आहेत त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या गरजेतून पालकांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
HSC निकाल | बारावीसाठी 20:40:40 फॉर्म्युला | 3 वर्षांच्या गुणांवर निकाल | २ दिवसांत अंतिम निर्णय
राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार असून त्यासाठी २०: ४०: ४० असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. कोरोनामुळे राज्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. १० वी इयत्ता १२ वीच्या परीक्षा महाराष्ट्राने रद्द केल्याची घोषणा ३ जून रोजी केली होती.
2 वर्षांपूर्वी -
दहावीच्या परीक्षेत 90% गुण प्राप्त केलेल्या 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान - मंत्री धनंजय मुंडे
अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करा | 10 दिवसांत अंतर्गत मूल्यांकन योजना बनवा - सुप्रीम कोर्ट
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना 31 जूलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच 10 दिवसांत अंर्तगत मूल्यांकन योजना तयार करण्यासदेखील सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
प्रचार तंत्र | मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे शैक्षणिक संस्थांना आदेश | नेहरूंनी ते कधीच केलं नाही
यूनिव्हर्सिटी ग्रांट्स कमीशन (UGC) ने सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि टेक्निकल इंस्टीट्यूट्सना मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी सोमवारी दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 याच महिन्यात 18+ वयोगटासाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. सोमवारी याची सुरुवात झाली. रविवारी विविध यूनिव्हर्सिटीजच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका व्हॉट्सअॅप मेजेसमध्ये UGC सेक्रेटरी रजनीश जैनने संस्थांच्या सोशल मीडिया पेजवर धन्यवादचे बॅनर शेअर करण्यास सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) शिवाय प्रवेश दिला जाणार आहे. नुकतंच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मतारखेचा दाखल्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
CBSE 12वी रिजल्टचा फॉर्मूला | सुप्रीम कोर्टात रिपोर्ट सादर | या आधारे ठरणार निकाल
CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी बनलेल्या 13 सदस्यांच्या कमेटीने गुरुवारी सुप्रीम कोर्टात आपली रिपोर्ट सादर केली. यात बोर्डाने निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, याबाबत माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल 10वी, 11वीचा अंतिम निकाल आणि 12वीच्या प्री-बोर्डाच्या निकालावर ठरवला जाणर आहे. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास, 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
BREAKING | यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास | अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. काल (११ जून) संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यात शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार | आता विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अनिवार्य | ब्रीज कोर्स म्हणजे काय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
2 वर्षांपूर्वी -
१०'वीच्या विद्यार्थ्यांचा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होण्याचे संकेत
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यातील HSC परीक्षा रद्द | आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.
2 वर्षांपूर्वी -
FYJC Class Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार | कशी असेल संपूर्ण प्रक्रिया
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र १२वीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
वाढता कोरोना संसर्ग | ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
2 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द तर १२वीच्या परीक्षा लांबणीवर
CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती.
2 वर्षांपूर्वी -
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल
-
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला