महत्वाच्या बातम्या
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिर हे वापरले जातात. जिरे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत जिऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. तसेच त्वचेसाठी आणि वजन कमी करण्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. जिऱ्यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी आणि एन्टीऑक्सिडेंट गुण आढळतात. जे आरोग्यासह तजेलदार, चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
7 दिवसांपूर्वी -
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे जर तुम्ही फणस खात नसाल किंवा कमी खात असाल, तर तुम्ही चुकी करताय. जीवनसत्त्वांनी युक्त असं हे फळ तुम्ही शक्य तितक खायला हवं . आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ
7 दिवसांपूर्वी -
लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्रात सर्वात कमी | जावडेकरांकडून चुकीची माहिती
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर आरोप केले होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता याला राजेश टोपेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
8 दिवसांपूर्वी -
मुंबई लसीकरण | ही आहे कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची यादी
मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे.
8 दिवसांपूर्वी -
Health first | शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी करा हे उपाय। नक्की वाचा
मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. यासाठी प्रत्येकाला हिमोग्लोबिन विषयी सर्व माहिती माहीत असायलाच हवी.
8 दिवसांपूर्वी -
Health first | केसांची समस्या आहे ? वापरा कांद्याचे तेल आणि पहा परिणाम
हिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते
8 दिवसांपूर्वी -
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
अतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.
8 दिवसांपूर्वी -
Health first | डाळिंब खाणे आहे आरोग्यासाठी लाभदायक । वाचा सविस्तर
डाळिंब या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे. तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी असे वाटत असेल तर दररोज डाळिंब खा. डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोहन (Iron), फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. निरोगी राहते.
8 दिवसांपूर्वी -
Health first | ब्लूबेरी खा आणि दात किडण्यापासून रोखा । अधिक माहितीसाठी वाचा
दातांची समस्या ही एक खूप साधारण समस्या आहे. भेसळयुक्त अन्न आणि दातांची न घेतलेली निगा यामुळे मोठा त्रास होण्याची शक्यता असते. त्याने आपल्याला खाणे आणि बोलण्यासाठी त्रास होऊ शकतो. परंतु, तुम्ही जर रोजच्या आहारात ब्लुबेरी हे फळ खाल्ले तर दातांच्या जवळपास सर्व समस्यांचं निराकरण त्यातून होऊ शकतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लुबेरी हे फळ दातासाठी खुप लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्लुबेरी खाण्याचे तीन फायदे.
8 दिवसांपूर्वी -
Health First | गायीचे शुद्ध सात्विक तूप आहे आरोग्यास हितकारक । नक्की वाचा
आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेलं तूप अनेकांना आवडत नाही. तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण जेवणाची चव वाढवण्यासह शुद्ध तूपाचे अनेक फायदे आहेत. एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
9 दिवसांपूर्वी -
Health First | पायांत गोळे येत असतील तर करा हे उपाय
पायात पेटके येणे, गोळे येण्याची तक्रार काही जणांकडून वारंवार केली जाते. पायात गोळे येण्याची अनेक कारणे आहेत. पाणी कमी पिणे, पायांना योग्य प्रकारचा व्यायाम न देणे, आहारामध्ये पोषणमूल्यांची तुट असल्याने पायात गोळे येतात.
9 दिवसांपूर्वी -
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात. चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.
9 दिवसांपूर्वी -
Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
मोठया प्रमाणात लोकांना पनीर आवडतं. त्याचे कारण म्हणजे, भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.
9 दिवसांपूर्वी -
Health First | खजूर खा आणि आजारांना लांब ठेवा । नक्की वाचा
दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
9 दिवसांपूर्वी -
Health First | जाणून घ्या किवी फळाचे गुणधर्म । सविस्तर वाचा
किवी फळ दिसायला चिकू सारखे दिसते. हे ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते. फळात व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच हे फळ डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप उपयुक्त ठरतो.
10 दिवसांपूर्वी -
Health First | तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि पहा परिणाम
रोज सकाळी पाणी प्यावे हे घरातले त्याचबरोबर डॉक्टर देखील सांगतात. पण पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो. काही वर्षापूर्वी सर्वांच्याच घरी तांब्याची भांडी असायची. मात्र कालांतराने काचेची,स्टील ची भांडी वापरण्यास सुरुवात झाली. तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात. तांब्यामुळे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.
10 दिवसांपूर्वी -
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मखाना म्हणजे कमळ बीज. हे एक मधुर आणि पौष्टिक खाद्य आहे. फॉक्स नट, फूल-मखाना, लोटस सीड आणि गॉर्गन नट अशा नावांनी हे ओळखले जाते. याचे बियाणे भाजून घेतल्यानंतर अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त हे अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
10 दिवसांपूर्वी -
Health First | गरम पाणी पिणे आहे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा
पाणी म्हणजे जीवन. मनुष्य पाणी न पिता राहू शकणार नाही. पाणी सेवनाचे अनेक फायदे शरीराला मिळत असतात त्यातील मुख्य म्हणजे आपले शरीर ओलसर राहते आणि त्वचा नरम राहते. तहान लागली कि आपण पाणी पितो तसेच खाल्ल्यानंतरहि पाणी आवश्यक असते.
10 दिवसांपूर्वी -
Health First | तुळशीची पाने दुधातून घेणे आहे आरोग्यासाठी लाभदायक। नक्की वाचा
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते.
10 दिवसांपूर्वी -
Health First | लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स । अधिक माहितीसाठी वाचा
मुंबई ५ एप्रिल : पहिला दात येणापुर्वीच त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. बाळाला स्तनपान दिल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडाने त्याच्या हिरड्या पुसुन घ्याव्यात. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आयुष्यभर निरोगी राहाणे आणि सुंदर हास्य यासाठी दातांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते. दातांची काळजी कशी घ्यावी : माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणं, जेवणानंतर व्यवस्थित चूळ […]
11 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा
-
Health First | पनीर खाणे आरोग्यासाठी लाभदायी । नक्की वाचा