महत्वाच्या बातम्या
-
लष्कराने सीमा रेषा ओलांडून अनेकदा कारवाया केल्या | पण सर्जिकल स्ट्राईकचा मोदींकडून अतिप्रचार
इंदिरा गांधी या पंतप्रधान असत्या तर ज्या प्रकारे त्यांनी सिक्कीम सोबत केलं त्याचप्रमाणे याला त्यांनी नकार दिला नसता,’ असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. ‘नेपाळमध्ये राजेशाही सुरू झाल्यानंतर नेहरूंनी त्या ठिकाणी लोकशाही स्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शाह यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता. परंतु नेहरूंनी त्या प्रस्तावाला नकार दिला. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांनं तसंच राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्याजागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी या संधी स्वीकारली असती. जसं त्यांनी सिक्कीमसोबत केलं होतं,’ असंही यात प्रणव मुखर्जी यांनी नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
Nagrota encounter | २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला
जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या घटनेचं वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं. पण नगरोटा इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता.
4 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन | २ जवान शहीद | ४ नागरिकांचाही मृत्यू
सणाच्या तोंडावरच पाकस्तानने (Pakistan) आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) केले. या दरम्यान भारताचा एक जवान शहीद झाला असून एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. जखमी नागरिकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर | कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये तीन जवान शहीद | दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ दहशतवादी मारले गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
६ वर्ष लष्कराला खराब दर्जाचा दारुगोळा | ९६० कोटी वाया गेले | लष्कराचा अंतर्गत रिपोर्ट
मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा (dangerously faulty ammunition) खरेदी करण्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर खिळे लावलेल्या रॉडने हल्ला केल्याचं उघड
गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये सीमारेषेवर हालचालींना वेळ आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय सैन्याकडून चीनचे ५ सैनिक मारले गेले, ११ सैनिक जखमी
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात काही महिन्यांपासून तणवाचं वातावरण असताना हिंसक झडप झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये एक भारतीय लष्करी अधिकारी आणि २ जवान शहीद झाले आहेत. गलवान खोऱ्यात ही झडप झाली. यामध्ये चीनचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप, एक भारतीय अधिकारी आणि २ जवान शहीद
लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
काश्मीर खोऱ्यात २४ तासांत ९ दहशतवादी ठार, १ जवान शहीद
भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज वर्ष पूर्ण; शहीद वीर जवानांना श्रद्धांजली
पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
पीओके भारतात आला पाहिजे अशी संसदेची इच्छा असेल तर आम्ही...काय म्हणाले लष्करप्रमुख?
नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओके भारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: महाराष्ट्राचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर जाधव जम्मू-काश्मिर सीमेवर शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकंच शोककळा पसरली आहे. धकटवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: शहीद संदीप सावंत अमर रहे! लष्करी इतमामात अखेरचा निरोप
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे. हा नरोप देताना महाराष्ट्रही गहिवरला आहे. संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. त्यांची अवघी काही महिन्यांची असलेली मुलगी पोरकी झाली. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातले सगळे लोक जमले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
सीमा पोलीस दलातील सहकाऱ्यांचा एकमेकांवर गोळीबार; ६ जवानांचा मृत्यू
इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ६ जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: लष्कर भरतीच्या ६३ जागांसाठी २० हजार तरुण; भीषण बेरोजगारीचं वास्तव
नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये लष्कराच्या भरतीसाठी तब्बल ३० हजार तरुण दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील ११६ टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी आजपासून लष्कराने भरतीची प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील शेकडो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे सुपुत्र सुनील वाल्टे भारत-पाक सीमेवर गोळीबारात शहिद
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे. ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास केव्हाही तयार: लष्करप्रमुख
काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैन्यात धक्काबुक्की; लष्कराची कुमक वाढवली
एकीकडे पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण असताना बुधवारी भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार लडाखमध्ये घडला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. १३४ किलोमीटर लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला.
5 वर्षांपूर्वी -
सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल?
लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईद दिनी दहशतवादी हल्ल्याचं सावट
गुप्तचर विभागाने (आयबी) ईदनिमित्त हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी बकरी ईदच्या निमित्ताने इस्लामिक स्टेट आणि आयएसआयचा पाठिंबा असलेले दहशतवादी हल्ला करू शकतात, असा अलर्ट आयबीने जारी केला आहे. त्यामुळे दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या शहरातील एअरपोर्ट, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा