महत्वाच्या बातम्या
-
IND vs ENG | भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Ind Vs Eng 2nd Test | अश्विनने ५ बळी टिपले | दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४
पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.
4 वर्षांपूर्वी -
सचिनच्या त्या ट्विटनंतर अर्णबने त्याला थेट राष्ट्रविरोधी लेबल लावलं होतं | भाजप नेते शांत होते
पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव | पंत-गिलची दमदार फलंदाजी
रिषभ पंतने केलेल्या तडाखेदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण | पुकोव्हस्कीला 2 जीवनदान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर असलेला रिषभ पंत पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. नेटीझन्सने पंतला पुन्हा एकदा निशाण्यावर धरलं आहे. पंतने कीपींग करताना ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्कीला तब्बल 2 जीवनदान दिले. म्हणजेच पुकोव्हस्कीच्या दोनदा कॅच सोडल्या. यामुळे पंत चांगलाच ट्रोल होत आहे. #Pant ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी | प्रकृती स्थिर
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या तब्येतीबाबत वूडलॅन्ड्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासात गांगुलीवर आणखी एक एन्जियोप्लास्टी करण्यात येईल. याबाबतचा निर्णय डॉक्टर देतील. पुढच्या आठवड्यामध्ये गांगुलीला डिस्चार्ज मिळू शकतो, तसंच त्याची बायपास सर्जरी करण्याची बहुतेक गरज पडणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असं वूडलॅन्ड्स रुग्णायलाच्या सीईओ रुपाली बसू यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय क्रिकेटर बीफ खातात | रोहित शाकाहारी असल्याने शंका
मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण करणं टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना चांगलंच अंगाशी आलं आहे. टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिलचा समावेश होता. या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. यामध्ये त्यांनी बीफही खाल्ल्याचा दावा केला जातोय. यामुळे खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS T20 | सलग दुसरा T-२० सामना जिंकत भारताची मालिकेत बाजी
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं.
4 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus | पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय
टीम इंडियाने (Indian Cricket Team Tour of Australia 2020-21) पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा (India Cricketer Ravindra Jadeja), थंगारासू नटराजन (India Cricketer Thangarasu Natrajan) आणि युजवेंद्र चहल (India Cricketer Yuzvendra Chahal) ही तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.
4 वर्षांपूर्वी -
IND vs AUS | भारतीय गोलंदाजांची धुलाई | भारताला विजयासाठी हव्यात ३७५ धावा
यजमान ऑस्ट्रेलियाने पाहूण्या भारतीय संघाचे धमाकेदार स्वागत केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात (India Vs Australia First One Day Cricket Match) ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३७५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले.
4 वर्षांपूर्वी -
ICC Women's T20 WC Final: भारताला नमवून ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने ८५ धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल ५ वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ९९ धावांवर ढेपाळला.
5 वर्षांपूर्वी -
T20 Women's World Cup : सामना न खेळूनही टीम इंडियाने घडवला इतिहास
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊलं दूर आहे. आज भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल सामना होणार होता. मात्र पावसामुळं हा सामना रद्द झाला. त्यामुळ आयसीसीच्या नियमामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला.
5 वर्षांपूर्वी -
IND vs NZ 2nd Day : सर्व भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो दुसऱ्या दिवशी सुरूच
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डावाची अक्षरशः घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवशी हे फलंदाज भारताची आघाडी कितीने वाढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ 2nd Test : भारताचा पहिला डाव २४२ धावांत आटोपला
ख्राईस्टचर्च कसोटीतही भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका संघाला बसला आहे. चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ २४२ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
5 वर्षांपूर्वी -
India VS Bangladesh : भारताचा बांगलादेशवर १८ धावांनी दमदार विजय
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज बांगलादेशला १८ धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सोळा वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आजच्या सामन्याची मानकरी ठरली. शेफालीने १७ चेंडूत ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
T20 WC 2020 Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी
पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांवर ऑल आऊट केला.
5 वर्षांपूर्वी -
Under-19 World Cup IND Vs PAK: पाकला घरचा रस्ता, टीम इंडिया फायनलमध्ये
१९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ 3rd T20I : न्यूझीलंड'समोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान
तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के एल राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. रोहित शर्मी-राहुलने ८९ धावांची भागिदारी केली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठरावीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबेला कर्णधाराने तिसऱ्या स्थानावर पाठवले. मात्र, त्याला याचा फायदा घेता आला नाही.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
India Vs New Zealand T-२०: झीलंडचे टीम इंडियाला २०४ धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा