महत्वाच्या बातम्या
-
जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – पंतप्रधान मोदी
जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मीर: सतर्क जवानांनी उधळून लावला पुलवामासारखा मोठा हल्ला
दहशतवाद्यांच्या पुलावामासारख्या हल्ल्याची योजना लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे टळल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.
5 वर्षांपूर्वी -
काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद
भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लष्करात महिलांचा सर्वोच्च मान; मोदी सरकारचा तर्क चुकीचा व भेदभाव करणारा: सुप्रीम कोर्ट
लष्कारातल्या महिलांसाठी सुप्रीम कोर्टाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. लष्करात महिलांसाठी स्थायी कमिशन निर्माण करा असा आदेश कोर्टानं दिला आहे. या आधी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला होता. मात्र काही तांत्रिक कारणं देत केंद्राने याबाबत निर्णय घेतला नव्हता. तसेच त्याला सुप्रीम कोर्टात आव्हानही दिलं होतं. आता समानतेच्या मुद्यावरून केंद्राने हा निर्णय दिला असून केंद्राला फटकारलं आहे. महिलांच्या प्रश्नांवर मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महिलांच्या स्थायी कमिशनचा मार्ग मोकळा झालाय. लष्करामध्ये महिलांबाबत जी कोंडी निर्माण झाली होती ती फुटण्यासाठी या निर्णयाने मोठी मदत होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सैन्यदलावर सायबर हल्ला; जवानांना मोठ्याप्रमाणावर हायपरलिंकसोबत फिशिंग मेल
पाकिस्तान-चीनने भारतीय सैन्यदलांना इतर कुरापती करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून थेट बी भारतीय सैन्यावर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे आणि भारतीय सैन्यदलाचे जवान यावेळी केंद्रस्थानी असल्याचं वृत्त आहे. कारण भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला असून लष्कराने देखील सतर्कतेचा इशारा म्हणौन आपत्कालीन स्थिती घोषित करत जवानांनी मेल उघडताना, त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास ते अजिबात उघडू नयेत असे सक्तीचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: भारतानं मारले पाकचे सैनिक, पाकिस्ताननं पांढरं निशाण फडकवलं
जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं होतं. यानंतर पाकचे सैनिक या घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची
लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
6 वर्षांपूर्वी -
पकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar
पाकिस्तान एअर फोर्स ची ३ युद्ध विमानं भारतीय हद्दीत शिरताच भारतीय एअर फोर्स ने त्यांना प्रत्युत्तर देत त्यातील १ विमान हाणून पाडले परंतु त्यातील पायलट बेपत्ता असल्याची माहिती दिली. आणि या चकमकीत आपले १ विमान पाकिस्तान हद्दीत क्रॅश झाले, परंतु त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे प्राण वाचले.
6 वर्षांपूर्वी -
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशदवादी हल्ला ८ ठार ११ जखमी
जम्मू काश्मीरमधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एकूण ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्यात शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांचा आक्रोश
पुलवामा हल्ल्यात शहीद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांचा आक्रोश
6 वर्षांपूर्वी -
हवाई दलाची जवानांसाठी जुनी विमाने; जीव गमावलेल्या वैमानिकाच्या भावाचा संताप
मागील आठवड्यात बंगळुरु येथे मिराज २००० या लढाऊ विमानातून सराव करते वेळी विमानाचा अपघात होऊन स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी इंदापूर तालुक्यात कार्वर विमानाला अपघात होऊन सिद्धार्थ हा वैमानिक जखमी झाला. यानंतर या अपघातांबद्दल वादळ उठले आहे. प्रशिक्षण देताना किंवा सरावासाठी हवाई दलाच्या वैमानिकांना व इतर वैमानिकांना जुनी लढाऊ विमाने दिली जातात, ज्यामुळे त्यांचे जीव धोक्यात असतात अशी तक्रार चहूबाजूंनी होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
BSF मधील जेवणाच्या दर्जावर तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याबद्दल थेट समाज ,माध्यमांवर मांडणारा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले BSF जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सदर प्रकरण आत्महत्येचं असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी महिला एजंटकडून तब्बल ५० भारतीय जवानांविरुध्द हनी ट्रॅप?
भारतीय लष्कराच्या तब्बल ५० जवानांविरुद्ध हनी ट्रॅप लावला गेल्याचे भारतीय लष्कराच्या प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान, या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय आणि महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरविण्यात आल्याचा संशय भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलगाव: शस्त्र भांडाराजवळ स्फोट; ६ ठार
येथील पुलगावमध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ६ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही स्थानिक नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच जखमींचा आकडा अजून वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरात जोरदार हादरे बसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: शोपियान चकमकीत २ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात मोठी चकमक झाली. उपलब्ध वृतानुसार, भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तपणे पार पाडलेल्या मोहीमत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या सूचनेवरुन जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्या?
जम्मू-काश्मीरमधील ३ पोलिसांच्या क्रूर हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या आदेशावरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील ३ विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुराव्यानिशी उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
लष्कराने कुपवाडा जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना जिवंत पकडलं
भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील हंदवाड्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीनं केलेल्या धडक कारवाईत चार दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. मात्र या कारवाई दरम्यान अल बदर या आतंकवादी संघटनेतील ३ आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
बकरी ईदच्या दिवशी सुद्धा काश्मीरमध्ये पाकिस्तान व इसिसचे झेंडे फडकले
आज बकरी ईदच्या दिवशी सुद्धा काश्मीरमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त ए.एन.आय’ने प्रसिद्ध केलं आहे. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अनेक तरुणांनी चक्क पाकिस्तान तसेच अतिरेकी संघटना अससेल्या इसिसचे म्हणजे इस्मामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया’चे झेंडे फडकविला आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले. अमर रहे, अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहे..!
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH