महत्वाच्या बातम्या
-
Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल
कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. विशेष म्हणजे ब्राझिलमधील या संसर्गाच्या स्फोटाला रोखण्यात अपयश आलं तर संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. दिवस-रात्र कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. जेणेकरुन मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांकडून अधिक संसर्ग न होता त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार करता येतील. ब्राझिल कोरोना मृत्यूंच्या यादीत सर्वात पुढे आहे. रविवारी ब्राझिलमध्ये 37,017 नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले.
6 तासांपूर्वी -
जगातील सर्वात कडक लॉकडाऊन | ब्रिटनमध्ये तब्बल ९७ दिवसांनी अनलॉक प्रक्रिया सुरु
देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे.
3 दिवसांपूर्वी -
रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही - WHO
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्य सरकारकडून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे.
4 दिवसांपूर्वी -
कोरोना आपत्ती, महागाई, बेरोजगारी | ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
ब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
4 दिवसांपूर्वी -
राफेल लढाऊ विमान खरेदीत बोगस व्यवहार | भारतातील दलालांना करोडोचे गिफ्ट - फ्रेंच मीडिया
राफेल लढाऊ विमान घोटाळा फ्रेंच मीडियामुळे पुन्हा जगभरात चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या एका वेबसाइटने देसॉ एव्हिएशनकडून बोगस व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. या मीडियाने फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA दाखला देऊन रिपोर्ट जारी केला. कंपनीच्या 2017 च्या खात्यांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च करण्यात आले आहेत. इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विमानाचे मॉडेल बनवणाऱ्या कंपनीचे केवळ मार्च 2017 चे एक बिल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
12 दिवसांपूर्वी -
अमेरिका | कॅपिटॉलमध्ये हल्ल्यात एका पोलीसाचा मृत्यू | घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर
अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये अद्यापही हिंसाचार सुरूच आहे. एका वाहनाने धडक दिल्याने तिथे एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा एक कथित हल्ला असून या घटनेमुळे कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय.
14 दिवसांपूर्वी -
VIDEO | US President Joe Biden | जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. मात्र त्याला कारण ठरलं आहे ते त्यांचा विमानाच्या पायऱ्या चढताना व्हायरल होणार व्हिडिओ. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांच्या अत्यंत सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी सलग तीन वेळा घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. चांगली गोष्ट म्हणजे याघटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
28 दिवसांपूर्वी -
फ्रान्समध्ये तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता | एक महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा
देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले.
28 दिवसांपूर्वी -
नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा | ब्रिटन न्यायालयाचा मोठा निर्णय
पंजाब नॅशनल बँकेतील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्याला द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी याच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
VIDEO | फिलिपिन्समध्ये जन्मले दोन जीभ आणि एक डोळा असणारे कुत्र्याचे पिल्लू | पण....
फिलिपिन्सच्या अकलान प्रांतातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. खरंच, अकलान प्रांतात राहणाऱ्या एमी डी मार्टिन यांच्या पाळीव कुत्र्याने दोन पिल्लांना जन्म दिला. हे पाहून एमी आश्चर्यचकित झाली. यातील एक पप्पी सामान्य होता. परंतु दुसऱ्या पिल्लाचा आकार वेगळा दिसत होता. मार्टिनच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या पिल्लाला दोन जीभ असून एकच डोळा आहे.
2 महिन्यांपूर्वी -
मला कोणत्याही धमकीने काहीही फरक पडणार नाही | ग्रेटा थनबर्गनं FIR नंतर ठणकावलं
पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गुन्हेगारी कट रचणं आणि वैरभाव निर्माण करणं असे आरोप ग्रेटा थनबर्गवर ठेवण्यात आले आहेत. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
भविष्यातील राजकारण | डेटा सायन्स | चीनला जॅक मा नव्हे त्यांच्याकडील ग्राहक डेटा हवाय
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
3 महिन्यांपूर्वी -
पृथ्वीच्या नष्ट होण्याचं वर्ष ठरलं | तापमानही निश्चित | न्यूटनच्या पत्राचाही आधार - संशोधन
पृथ्वीचं आयुष्य नेमकं किती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जगभरात सध्या वारेमाप वृक्षतोड होत असताना जागतिक तापमानात होत असणारी वाढ देखील पृथ्वीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जंगल तोड होण्याच्या बाबतीत देशासहित जगभरात बोटावर मोजता येतील इतकीच लोकं जंगल आणि वृक्षांचं महत्व जाणतात. आपल्या देशातील मोजक्या लोकांना सोडल्यास अनेकांना तर जंगलतोड बद्दल काहीच आस्था नसून त्याचे परिणाम देखील माहित नसणं हे देखील मोठं चिंतेचं कारण आहे. पृथ्वीबद्दल ज्योतिषशास्त्राचे अंदाज विचारात न घेणं आपण समजू शकतो. मात्र भूगर्भ शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि वैज्ञानिकांचे संशोधनातून समोर आलेले आकडे दुलक्षित करणं वेडेपणाचं लक्षण म्हणावं लागेल.
4 महिन्यांपूर्वी -
शेतकरी आंदोलनाला कॅनडाच्या पंतप्रधानांचा पाठिंबा | भारत सरकारचं प्रतिउत्तर
नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे आता थेट परदेशातून या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटले आहे.
5 महिन्यांपूर्वी -
एक भौगोलिक आश्चर्य | या शहरात सूर्य मावळल्यावर ६६ दिवसांनंतरच उगवतो - सविस्तर वृत्त
जगभरात आश्चरचकीत करणारी अनेक ठिकाणं आहेत आणि त्यातही काही आश्चर्यांमधील आश्चर्य म्हणावी लागतील. मात्र जर त्या आश्चर्याचं कारण स्वतः भौगोलिक स्थिती असेल तर विचारायलाच नको. तसंच आहे जगातील एक आश्चर्यचकित करणार शहर आणि तिथली भौगोलिक स्थित असच म्हणावं लागेल.
5 महिन्यांपूर्वी -
VIDEO | मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण | व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला
मुंबई शहरावरील २६/११ हा दहशतवादी हल्ला संपूर्ण भारत कधीही विसणार नाही. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सकाळी अचानक मुंबईवर अत्याधुनिक हत्यारं घेऊन हल्ला केला होता. पोलिसांसहित अनेक सामान्य मुंबईकरांनी यामध्ये स्वतःचा जीव गमावला होता. संपूर्ण शहरात दिवसभर धावपळ पाहायला मिळाली होती. तसाच प्रकार ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरातील लोकांनी अनुभवला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं | मात्र त्यालाही एक सीमा असते | कॅनडाचे पंतप्रधान
फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. 72 तासांत दुसऱ्यांदा एकदा हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या ल्योन सिटीमध्ये चर्चच्या गेटवर चर्चच्या फादरवर गोळी झाडून अज्ञात हल्लेखोर फरार झाला आहे. चर्चच्या धर्मोपदेशकाला मारल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 72 तासांतला हा दुसरा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीक पारंपरिक चर्चमधील फादरवर खूप जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
6 महिन्यांपूर्वी -
पहील्या लाटेपेक्षा अधिक मृत्यूंची भीती | ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा
कोरोना वायरसची वाढती प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढली आहे. ब्रिटनदेखील कोरोनाच्या साखळीत अडकलाय. आता परीस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसरा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. कोरोना पॉझिटीव्हची वाढती आकडेवारी पाहता चार आठवडे म्हणजे एक महीना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेलाय.
6 महिन्यांपूर्वी -
VIDEO | दुबईच्या मशीदमध्ये 2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली | भीषण अपघात
भरधाव वेगानं कार घेऊन जाणाऱ्या एका तरुणानं सर्व बॅरिकेट्स तोडून थेट कार मशीदमध्ये घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बॅरिकेट्स तोडून ही कार मशीदच्या गेटवर जाऊन धडकली आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार | त्या ट्विटनंतर फ्रान्स ट्विटरवर भडकला
फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | ओठांच्या सुंदरतेसाठी करा हे उपाय । नक्की वाचा
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा
-
कोरोना आपत्ती | देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे - केंद्र सरकार