महत्वाच्या बातम्या
-
ज्या क्षणी लोकांना नवा पर्यायी दिसेल, तेव्हा तुम्ही सत्तेत नसाल | ममतांचा भाजपाला थेट इशारा
तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मान्य केले की भारतीय जनता पक्ष केंद्रात राज्य करत आहे कारण या क्षणी कोणताही पर्याय नाही आणि केवळ विधान केल्याने मदत होऊ शकते म्हणून इतर राजकीय पक्षांना पर्याय शोधण्यासाठी एकत्र काम करावे लागेल. फायदा होणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Bhabanipur Bypoll Result | ममता बॅनर्जींचा भवानीपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजयी
विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी 'राजकीय स्टंट' करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड | ममतादीदींच्या रोम दौऱ्यावर बंदी घातली
मागील काही दिवस महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमैय्या यांच्या ‘आरोप पर्यटन दौऱ्यावरून’ मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे किरीट सोमैय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांच्यावर घालण्यात आलेल्या कोल्हापूर बंदीवरून राज्यातील नेत्यांनी प्रचंड राजकारण केल्या पाहायला मिळालं. मात्र आता भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे आणि त्याला कारण ठरल्या आहेत त्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी -
GDP'चा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झालाय | २०२४ मधील निवडणुकीत मोदी विरुद्ध देश असेल - ममता बॅनर्जी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ममतादीदी-पंतप्रधान भेट | लोकसंख्येप्रमाणे कोरोना लस आणि पेगासस प्रकरणी सर्वपक्षीय बैठकीची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली आहे. दरम्यान, ममता यांनी देशातील कोरोनाची स्थितीवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. बंगाल राज्याला मिळणारी लसीची मात्रा वाढवण्यास सांगितले असून बंगालला लोकसंख्येनुसार लस मिळावी अशी मागणीदेखील ममता यांनी पंतप्रधानांना यावेळी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन रेकॉर्ड केले जातात | त्यामुळे मी शरद पवार, ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू शकत नाही - ममता बॅनर्जी
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार | ममता कडाडल्या
पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार टीका करताना, देशाला प्लास्टर करण्याची गरज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त केलेल्या संबोधनादरम्यान व्यक्त केली. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे. केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल, असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत ‘खेला’ होणार, असे आव्हानच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल भाजपमध्ये मोठी फूट | 74 पैकी 51 भाजप आमदारच राजभवनात
प. बंगालमधील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भारतीय जनता पक्षाचे आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो | प. बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून गावभर फिरून जनतेची माफी
भारतीय जनता पक्षाचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाचे तारे फिरल्याचे पाहायला मिळतंय. त्यात भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणारे मोठे नेते आणि सामान्य कार्यकर्ते सुद्धा स्वगृही परतू लागले आहेत. मात्र तत्पूर्वी देखील ते भाजपाला दोष देत स्वतःच्या चुका मान्य करून गावागावात माफी मागत फिरत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | पंतप्रधान मोदींच्या त्या कॉलनंतरही मुकुल रॉय तृणमूलमध्ये परतले
भारतीय जनता पक्षात नाराज असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मुकुल रॉय यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला मुलगा आमदार शुभ्रांशू रॉय आणि समर्थकांसह त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. या दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क पुन्हा वाढवला. भाजपच्या कित्येक बैठकांमध्ये गैरहजर असताना त्यांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल भाजपाला धक्का | भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. मुकूल रॉय तृणमूलमध्ये प्रवेश करणार
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींचे पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजप टेन्शनमध्ये | ममता बॅनर्जी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भारतीय जनता पक्षाला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना संबंधित दलबदलूंना आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोफत लसीकरणासाठी फेब्रुवारीपासूनच मुख्यमंत्र्यांची मागणी होती | निर्णयासाठी मोदींना ४ महिने लागले - ममता बॅनर्जी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली असून फार आधीच त्यांनी हा निर्णय घेतला असता तर अनेक जीव वाचले असते असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | मोदींचा फोटो नव्हे, आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, मात्र आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर | मोदी-शहांची डोकेदुखी वाढणार
प. बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. परंतु, तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी माष्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत | भाजपचे ८ आमदार आणि काही खासदार तृणमूलच्या गळाला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठा माष्टरस्ट्रोक देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. ममता बॅनर्जी आता २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत असल्याचं देखील म्हटलं जातंय. परिणामी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षात चिंतेचं वातावरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
ममतादीदींचं जशास तसे उत्तर | मुख्य सचिवांना निवृत्त करून प्रमुख सल्लागार बनवले, केंद्रीय राजकारणाची हवाच काढली
केंद्र आणि बंगाल सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सोमवारी नवीन वळण लागले आहे. बंगालचे मुख्य सचिव अलापन बंधोपाध्याय यांना सोमवारी सकाळी केंद्राने दिल्ली येथे बोलावले पण ते तेथे पोहोचले नाहीत. यानंतर केंद्र सरकारने अलापन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र असो किंवा प. बंगाल | वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरून केंद्रीयं अडथळ्यांचे राजकारण सुरूच
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य आणि पक्षीय राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्याचं मोदींच गुजरातमधील तंत्र देश पातळीवर देखील राबवलं गेल्याचे अनेक दाखले आहेत. अगदी उत्तर प्रदेशात देखील त्यांनी माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पदी बसवून तिथलं राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतःकडे ठेवण्याची योजना आखल्याचं वृत्त आहे. तर महाराष्ट्रात देखील राज्यातील नेमके जे वरिष्ठ IPS अधिकारी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर गेले त्यांनीच राज्य सरकारला अडचणीत आणल्याचं राजकारण देखील ताजे आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ममतांनी मोदींना ऑन कॅमेरा झापलं | म्हणाल्या, आमचा विजय झाला हे तुमच्या चिंतेचं कारण आहे का?
यास’ चक्रीवादळामुळे ओदिशात झालेल्या हानीचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला, तेव्हा वरचेवर येणाऱ्या वादळांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची व आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओदिशा सरकारच्या वतीने करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी मोदींवर भडकल्या | पंतप्रधानांनी बैठकीत कोणत्याच मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामील झाल्या, पण त्यांच्या राज्याचा कुठलेही जिल्हाधिकारी सामील झाले नाही. मोदींच्या बैठकीनंतर ममतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदींच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, बैठकीत 10 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते, पण कुणालाच बोलू दिले नाही. हे अपमानजनक आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN