Maruti Suzuki SUV EVX | बहुचर्चित मारुतीची इलेक्ट्रिक एसयूव्ही 'ईव्हीएक्स'चं अनावरण, तपशील जाणून घ्या
Maruti Suzuki SUV EVX | देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती ब्रेझा मॅट ब्लॅक, ग्रँड विटारा मॅट ब्लॅक व्यतिरिक्त नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही संकल्पना मारुती सुझुकी ईव्हीएक्सचे अनावरण केले आहे. मॅट ब्लॅक शेडमधील मारुती ब्रेझाची रचना पूर्वीसारखीच आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक एसयूव्ही प्लॅटफॉर्मवर कंपनीकडून एसयूव्ही – ‘ईव्हीएक्स’ तयार करण्यात आली असून, ती पूर्ण चार्जवर ५५० किमीची ड्रायव्हिंग रेंज देणार आहे.
1 वर्षांपूर्वी