महत्वाच्या बातम्या
-
वंचित आघाडी ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार
लोकसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय प्राप्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आघाडीच्या सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच २८८ जागांवरील उमेदवारांच्या चाचपणी प्रक्रियेवरील जोरदार चक्र सध्या फिरताना दिसत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएम’ने विधानसभेच्या तब्बल शंभर जागांची मागणी करत संभाव्य उमेदवारांची संपूर्ण यादीच प्रकाश आंबेडकरांकडे सुपूर्द केली होती.
6 वर्षांपूर्वी -
खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मालेगावात सत्तेसाठी धर्म विसरून MIM सोबत सेटलमेंट, तर औरंगाबादमध्ये घरात घुसून मारण्याची सेनेकडून धमकी
महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: एमआयएम'चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर सेनेचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानावर
लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये एमआयएम’चे इम्तियाझ जलील आघाडीवर तर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे थेट तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सध्या प्राथमिक फेरीत चित्र.
6 वर्षांपूर्वी -
आमचे भांडण किती जागा मिळाव्यात यासाठी नाही: प्रकाश आंबेडकर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा पार पडली. दरम्यान, केंद्रात सत्तेवर आल्यावर आरएसएस’ला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तरच त्यांच्याशी आम्ही युती करू असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या सभेत केला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या सांगण्यावर सभेची स्थळं निश्चित? आज शिवाजी पार्कात वंचित आघाडीची जाहीर सभा
मागील ३ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांच्या धडाक्यानंतर आज मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस महाआघाडीत सहभागाची अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. एमआयएमचे अध्यक्ष खा. असुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
MIM आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेतली
महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या आडून समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप करत MIM चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सदर मराठा आरक्षणा संदर्भातील दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका अखेर मागे घेतली आहे. तसेच, महाराष्ट्र मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल मूळ याचिकाकर्ते तसेच विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांमध्ये फंडिंग चर्चा? बवंआ'च्या सभांना भाजप'प्रमाणे महागडे मंच, एलईडी, मैदानं व संसाधनं?
भाजपच्या प्रत्येक सभा आणि सभेदरम्यान सहज नजरेस पडणारी महागड्या सभेची संसाधनं म्हणजे भव्य मंच, त्यामागील भव्य एलईडी डिस्प्ले, भव्य मैदान आणि अगदी आदेशाप्रमाणे करण्यात येणारे सभेचे थेट प्रक्षेपण हे डोळे दिपवून टाकणारं आहे. परंतु, त्यासाठी खर्ची करावा लागणारा प्रचंड पैसा विरोधकांच्या मनात वेगळीच शंका व्यक्त करत आहे. कारण, कोणत्याही केंद्रीय, राज्य, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये सत्तेत नसलेल्या दोन पक्षांकडे नेमका पैसा कुठून येतो आहे, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांना मुस्लिम मुक्त देश हवा, ओवेसीचं वक्तव्य
तेलंगनात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यरोपांच्या मलिका सुरु झाल्या आहेत। त्यामुळे आजच्या सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की , “भाजपला एमआयएम मुक्त नाही तर मुस्लिम मुक्त देश हवा आहे. त्यामुळे भाजपला काही करून तेलंगणात विजय मिळवायचाच आहे, असं ओवेसी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
सभे दरम्यान असदुद्दीन ओवेसींवर बूट भिरकावला
मुंबईत आयोजित एका सभे दरम्यान असदुद्दीन ओवेसींवर बूट फेकून मारण्यात आला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स फोकसमध्ये, स्टॉक प्राईस पुन्हा हा टप्पा ओलांडणार - NSE: JIOFIN
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Suzlon Share Price | 30 टक्के परतावा मिळेल, सुझलॉन शेअर्सबाबत अपडेट, तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या - NSE: SUZLON
-
TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, मॅक्वेरी ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | टोल महसुलात 18% वाढ, मल्टिबॅगर आयआरबी इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरु - NSE: IRB
-
Infosys Share Price | मॉर्गन स्टॅनली IT शेअरवर बुलिश, मिळणार मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: INFY