महत्वाच्या बातम्या
-
मुंबई | PSI मोहन दगडे यांचं कोरोनामुळे निधन | आजपर्यंत १०१ कर्मचाऱ्यांचं निधन
कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली.
14 तासांपूर्वी -
परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला
राज्यात सचिन वाझे प्रकरणात नवीन लढाई सुरू झाली आहे. राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांना घेरण्याची तयारी केली आहे. सरकार परमबीर सिंहांची वेगळी चौकशी करत आहे. याची जबाबदारी परमबीर सिंहांचे कट्टर विरोधी सीनियर IPS संजय पांडेंना देण्यात आली आहे.
1 दिवसांपूर्वी -
परमबीर सिंग खोटं बोलत आहेत की सचिन वाझे? | दोघांच्या पत्रांतील आरोपात विसंगती
मागील काही दिवसांपासून सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात एखादी कारवाई किंवा लेटर बॉम्ब प्रसिद्धीस येण्यापूर्वीच भाजपचे नेते त्याबाबत अचूक भविष्यवाण्या करत असल्याने त्यांच्यावरच संशयाची राजकीय शंका बळावते आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते बोलतात त्यानंतर NIA कडून काही माहिती बाहेर येते याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण होतेय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
4 दिवसांपूर्वी -
अँटिलिया स्कॉर्पिओ प्रकरण | परमवीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.
6 दिवसांपूर्वी -
BREAKING | परमवीर सिंगांच्या आदेशाने सचिन वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस | अहवालात खुलासे
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे. TV 9 मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
6 दिवसांपूर्वी -
मनसुख हिरेन प्रकरणी परमबीर सिंग ATS'च्या पत्रांना रिप्लाय देत नव्हते | मोठा खुलासा
सध्या मनसुख हिरेन प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याभोवती देखील संशयाचे वादळ निर्माण होताना दिसत आहे. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता. जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्रकरण याआधीच उलगडलं असतं, परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चार पत्रही पाठवली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले.
12 दिवसांपूर्वी -
गृहमंत्र्यांविरोधातील आरोपसंबंधी दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा पडली होती. सदर प्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी याचिका मागे घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
14 दिवसांपूर्वी -
रश्मी शुक्ला या बिल्डरांकडून खंडणी घेत | त्यांना फडणवीसांचे पाठबळ होते - हरिभाऊ राठोड
सध्या राज्यात फोन टँपिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात राज्य सरकारला मुख्य सचिवांनी अहवाल सादर केल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने गृह विभागाकडून मान्यता घेतली होती आणि तीच त्यांनी सरकार विरोधात वापरल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र आता रश्मी शुक्ला यांचावर अजून आरोप होण्यास सुरुवात झाली आहे.
17 दिवसांपूर्वी -
परमबीर सिंहांच्या पत्नी 5 कंपन्यांमध्ये डायरेक्टर | TRP प्रकरणानंतर LIC हाउसिंगच्या बोर्डवरुन हटवलं
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
18 दिवसांपूर्वी -
राज्य सरकारची दिशाभूल करून गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी - अहवाल सादर
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
18 दिवसांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार | हायकोर्टात जाण्याचा सल्ला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
20 दिवसांपूर्वी -
गुजरातच्या माजी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे IPS संजीव भट्ट जेलमध्ये | परमवीर सिंह कोर्टात आणि भक्त...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला होता. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
20 दिवसांपूर्वी -
तर ते भाजपमध्ये प्रवेश करणारे मुंबईचे दुसरे माजी पोलीस आयुक्त ठरतील?
सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदावर राहून सुरु असलेल्या हालचाली पाहता ते अचानक राजीनामा देऊन राजकरणात न उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात सचिन वाझे प्रकरणातील मूळ चौकशी सोडून संपूर्ण विषय अनिल देशमुख केंद्रित करण्याचा त्यांचा शिस्तबद्ध प्रयत्न सध्या बरंच काही सांगून जातोय.
21 दिवसांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी | परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव
परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
21 दिवसांपूर्वी -
परमबीर सिंग राज्यपालांना भेटणार | स्वतःला वाचवण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर हालचालींचा आरोप?
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केलेले असल्याने विरोधीपक्ष भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंग यांच्या पत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
22 दिवसांपूर्वी -
परमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही | हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
22 दिवसांपूर्वी -
परमबीर सिंहांनी ADG च्या तपासात साक्षीदारांना धमकावले | DGP ने पुण्यात गुन्हा दाखल करण्यापासून अडवले
महाराष्ट्राचे सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये त्यांनी आरोप केला की, मुंबई पोलिसचे कमिश्नर पदावर उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंहांनी ADG देवेन भारतींच्या विरोधात तपासामध्ये साक्षीदारांना धमकावले. अतिरिक्त सचिवांनी याच ADG च्या प्रकरणात तपास रोखण्याचा आदेश दिला. पत्रात त्यांनी मुंबई पोलिस कसे काम करत आहेत याची पद्धतशीरपणे माहिती दिली आहे. सचिव त्यात अडथळे कसे आणत आहेत. हे देखील त्यांनी सांगितले आहे.
23 दिवसांपूर्वी -
ना अधिकृत ई-मेल, ना स्वाक्षरी | परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरून अनेक प्रश्न उपस्थित
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
23 दिवसांपूर्वी -
सचिन वाझेंनी अनेक पुरावे नष्ट केल्याने NIA'च्या अडचणीत वाढ
मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
25 दिवसांपूर्वी -
केवळ सध्याच्या नव्हे तर मागच्या फडणवीस सरकारने देखील अन्यायच केला - ज्येष्ठ IPS संजय पांडे
सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करणाऱ्या ठाकरे सरकारसमोर एक नवा पेच उभा राहिला आहे. पोलीस दलातील या तडकाफडकी ‘अदलाबदली’मुळे वरिष्ठ अधिकारी संजय पांडे हे दुखावले गेले आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
25 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची | संसदेत चर्चा व्हावी
-
आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही
-
जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निकाल | देशमुखांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे CBI'ला आदेश
-
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
-
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा, माध्यमांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा | कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
-
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
-
लॉकडाउन नव्हे | तर परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे सरकारचे संकेत
-
गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी