महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | जेव्हा गुजरातचे भाजप नेते आणि अधिकारी CBI चौकशांमध्ये अडकलेले आणि मोदी CBI वर संतापलेले | हा व्हिडिओ पहा
पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने आपले गड शाबूत राखल्याबद्दल मोदींनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी सीबीआयविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.
5 महिन्यांपूर्वी -
मोदींसाठी पुण्यात भाजपचे इव्हेंट मार्केटिंग | विद्यार्थी रविवारी सुद्धा युनिफॉर्ममध्ये शाळेत | नेटिझन्सकडून टीका
आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झालं आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. त्यानंतर MIT कॉलेजमध्ये मोदींची सभा पार पडली.
5 महिन्यांपूर्वी -
BREAKING | केंद्रीय कृषी कायदे रद्द | शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मोदींना माफी मागायला भाग पाडलं
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी (Repeal of 3 agricultural laws) यांनी आज केली.
9 महिन्यांपूर्वी -
Kapil Sibal Vs Modi Shah | गुजरात मधून दिल्लीत आलेल्या नेत्यांना गांधीजींविषयी फारशी माहिती नाही - कपिल सिब्बल
गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही, अशा शब्दात काँग्रेसचे जी 23 चे बंडखोर नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर (Kapil Sibal Vs Modi Shah) टीकास्त्र सोडले आहे. महात्मा गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलजीवन मिशन 2 ची सुरुवात केली आहे. त्याच वेळी महात्मा गांधींना स्वच्छता मिशनची जोडले आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी त्यांच्यावर असत्यतेचा आरोप केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Fact Check | अंध भक्तांची पोलखोल | मोदी जगाची शेवटची आशा ही बातमी खोटी - न्यूयार्क टाइम्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत अखेर न्यूयार्क टाइम्सनेच अधिकृतपणे खुलासा करत, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’ ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
कोणीही टाळी वाजवली नाही | चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या UNGA'च्या भाषणावर टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा हा शेवटचा दिवस होता. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या या अभिभाषणाला देशाला गौरवान्नित करणारे असल्याचे म्हटले आहे, तर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टोमणा मारला आहे. यासोबतच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पीएम मोदींच्या वक्तव्याच्या बहाण्याने यूपी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना घेरले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
तुम्ही अमेरिकेत गेला आहात तर माझ्यासाठी शॉपिंग करा आणि माझ्यासाठी घेऊन या - राखी सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी विशेष बैठक घेतली. या दरम्यान, दोघांनी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री राखी सावंतने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतून स्वतःसाठी काहीतरी आणण्यास सांगितले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
VIDEO | मोदींचा अमेरिका दौरा | मोदींच्या स्वागतासाठी 'मॅनेज' लोकं जमवली | अमेरिकेत ऑन कॅमेरा पोलखोल झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी काल अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भेट घेतली. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. जो बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांची ही समोरासमोरची पहिलीच भेट असणार आहे.
11 महिन्यांपूर्वी -
भांडं फुटलं? | PM केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही | पंतप्रधान कार्यालयाची दिल्ली हायकोर्टात माहिती
पंतप्रधान केअर्स फंड ही धर्मादाय विश्वस्त संस्था (ट्र्स्ट) आहे. हा निधी भारत सरकारचा नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. ही संस्था धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या कायद्यांतर्गत येत असल्याचीही माहितीदेखील केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
मोदींचा वाढदिवस | नेटिझन्सनी थाळ्या वाजवत साजरा केला 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'
नेटिझन्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन नेटिझन्सनी ठीक ६ वाजून ६ मिनिटांनी करण्याचे आवाहन समाज माध्यमांवर केले होते.
11 महिन्यांपूर्वी -
VIDEO | मोदींच्या वाढदिवसादिनी भाजप आणि गोदी मीडिया असं अभियान राबवणार | आधीच केली होती पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्वतः नरेंद्र मोदी, मोदी सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आधीच निश्चित करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
PM Narendra Modi 71st Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाची शान - राज्यपाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वा वाढदिवस (PM Narendra Modi 71st Birthday) आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. भाजपने देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. इकडे पुण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ‘पुणे ऑन पॅडेलस’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन परत जाऊन याचा समारोप कोथरुड येथे झाला.
11 महिन्यांपूर्वी -
VIDEO | राणेंचा राष्ट्रभक्तीला हात | तर राष्ट्रगीताबाबतीत मोदींकडूनही घडली होती चूक | मग विरोधकही...
नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि त्यानंतर मिळालेला जामीन यामुळे भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलंच आक्रमक झाले आहेत. आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
'मोदी नामा'ची जादू उतरली | 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल - शिवसेनेचे टीकास्त्र
2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Pune Modi Temple | देव चोरीला गेला, पेट्रोल-गॅस दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? राष्ट्रवादीचा सवाल
पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Pune Narendra Modi Temple | नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली | कारण...
पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंडे नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. परंतु आता मात्र या मंदिरातील मोदींची मूर्ती इतर ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीतून ही मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे..ही मूर्ती एका नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट । वर्षभरात लोकप्रियता 66 टक्क्यांनी घसरून 24 टक्क्यांवर - सर्वेक्षण
इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांनी कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. भारतासाठी सर्वात उपयुक्त पंतप्रधान कोण असेल? असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल-कांदे होते, पण मोदींसारखा नेता नव्हता। नेटिझन्स म्हणाले ट्विटचे ५ रुपये क्रेडिट केले
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.
1 वर्षांपूर्वी -
पुणे | नमो फाऊंडेशनच्यावतीने बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर
पुणे शहर हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिथे विविध प्रकारचे पेशवेकालीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. पण आता पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
स्वातंत्र्यदिनी सुद्धा? | भारतीयांनो, मोदींनी २०१९ पासूनची जुनी घोषणा नामकरण करत पुन्हा २०२१ मध्ये चिकटवली - पोलखोल
75 व्या स्वातंत्र्यदिनी आठव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करत आहेत. लाल किल्ल्यावरून मोदी म्हणाले, ’75 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करणाऱ्या आणि जगातील लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अनेक शुभेच्छा. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र पर्वावर देश सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.’
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
-
Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Outstanding Tax Demand | रिटर्न प्रोसेसिंगनंतर येतेय 'आऊटस्टँडिंग टॅक्स डिमांड?, घाबरून जाण्याऐवजी या स्टेप्स फॉलो करा
-
Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल
-
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Investment Tips | तुमच्या गुंतवणुकीत उत्तम असेट्स मॅनेजरची निवड कशी करावी?, फायद्याची माहिती जाणून घ्या
-
Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा
-
WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही